Goa Temperature Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature: तापमान 4 अंशांनी जास्तच, उद्याही शाळा 12 च्या आधीच सुटणार

उद्याही तापमान जास्तच राहणार

Akshay Nirmale

Goa Temperature: समुद्रावरून भूखंडाकडे वाहणारे मतलई वारे (सी ब्रिजेस) वेळेत सुरू झाल्याने आज शक्यता असलेली उष्म्याची लाट निर्माण झाली नाही. मात्र, तापमान नेहमीपेक्षा 4 अंश सेल्सिअस जास्त राहिले.

उद्याही अशीच शक्यता असेल, असा अनुमान हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार शाळा दुपारी 12 लाच सोडण्यात आल्या. उद्याही याची अंमलबजावणी होईल.

उन्हाळ्याच्या दिवसांत समुद्रकिनारी भागातील तापमान हे समुद्रावरून वाहणाऱ्या मतलई (खारे) वाऱ्यावर अवलंबून असते. हे वारे सर्वसाधारणपणे सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्थिर होतात. मात्र, या वाऱ्यांना उशीर झाल्यास किनारपट्टी भागातील आणि लगतच्या प्रदेशातील तापमान झपाट्याने वाढते.

काल बुधवारी (ता. 8) हे वारे उशिरा वाहू लागल्याने तापमानात झपाट्याने वाढ झाली. ती 38.4 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी नोंदली गेली. त्याचा परिणाम उष्म्याच्या लाटेत झाला होता. मात्र, आज समुद्रावरून वाहणारे मतलई वारे वेळात सुरू झाल्याने राज्यातील बहुतांश भागाचे तापमान वाढलेले असले तरी 36 अंशापर्यंत पोहोचले.

सर्वसाधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास आणि ते नेहमीच तापमानापेक्षा सहा अंश वरचे नोंदले गेल्यास आणि आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे घटल्यास उष्म्याची (हिट वेव्ज) शक्यता असते.

शाळा 12 वाजताच सोडल्या

उष्म्याच्या लाटेचा सर्वात मोठा फटका लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना बसतो. हवामान खात्याच्या वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा दुपारी 12 वाजेपर्यंत सोडाव्यात, असा अध्यादेश काढला होता. त्यानुसार बहुतांश सर्वच शाळा आज दुपारी 12 वाजता सोडण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT