Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: पर्वरीत सर्वात उंच 21 फुटी शिवपुतळा

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण: चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

दैनिक गोमन्तक

Goa News: शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून येथील ‘मॉल द गोवा’च्या मागील जागेत राज्यातील सर्वात मोठ्या 21 फूट उंचीच्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज संध्याकाळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या चौकाचे नामकरणही ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे करण्यात आले. शिवरायांनी जिजाऊंकडून राजकारणाचे धडे घेऊन 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

शिवरायांप्रमाणेच आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सर्व लोकांना सोबत घेऊन देशाला सर्वोत्तम देश बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

देशहितासाठी सर्वांनी पंतप्रधान मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते.

या प्रदर्शनासही पुतळा अनावरण सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी भेट देऊन शस्त्रांची पाहणी केली.

या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह, खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा, सुकूर जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पेन्ह द फ्रान्स व साल्वादोर द मुंद पंचायतीचे पंच व सरपंच तसेच मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT