Valpoi Fish Market Gomantak Digital Team
गोवा

Valpoi Fish Market : वाळपईच्या आठवडा बाजारात येते ‘सुक्या मासळी’ची दुर्गंधी

ग्राहकांना त्रास : भाजी, फळे विक्रेत्यांच्या जागेतच थाटतात व्यवसाय

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : वाळपई येथील आठवडा मंगळवारच्या बाजारात सुक्या मासळीच्या दुर्गंधीमुळे ग्राहक वर्गाला त्रास सहन करावा लागतो आहे. वाळपईचा आठवडा बाजार दोन ठिकाणी भरतो. मासोर्डे मार्गावर कपडे, चप्पल विक्रेते व वाळपई मैदान मार्गावर फळे, भाजी विक्रेते यांना जागा देण्यात आलेली आहे.

पण मागील काही दिवसांपासून फळे, भाजी विक्रेत्यांच्याच जागेत मध्येच मासळी विक्रेते बसत असल्याने भाजी, फळे खरेदी करताना नागरिकांना सुक्या मासळीच्या दुर्गंधीचा त्रास होतो आहे. मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी बाहेरील परप्रांतीय मासळी विक्रेते येतात व चक्क फळे, भाजी विभाग ठिकाणी बसून व्यवसाय करीत आहेत. भाजी, फळे खरेदी करताना सुक्या मासळीचा वास सोसवेना अशी स्थिती होते आहे.

पालिकेने कारवाई करावी

वाळपई नगरपालिकेने यासाठी पुढाकार घेऊन अशा बाहेरील मासळी विक्रेत्यांना दुसऱ्या मार्गावर जागा दिली पाहिजे. त्यासाठी वाळपई पालिकेने कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रकारामुळे स्थानिक मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे. बाजाराच्या दिवशी परप्रांतीय, बाहेरील विक्रेत्यांना मासळी विक्रीसाठी मुभा देणाची गरजच नाही. त्यांना येथे जागा देता नये, अशी मागणी ग्राहक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT