Rabies Dog Dainik Gomantak
गोवा

Rabies नियंत्रणात ठेवणारे गोवा राज्य देशात पहिले

गेल्या तीन वर्षात गोव्यात रेबीजमुळे एकही मृत्यू नाही

Dainik Gomantak

पणजी: रेबीज (Rabies) नियंत्रणात ठेवणारे गोवा (Goa) हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या तीन वर्षात गोव्यात रेबीजमुळे एकही मृत्यू झालेला नाही. 'मिशन रेबीज'चे (Rabies Mission) समन्वयक डॉ. मुरुगन अप्पूपिलाई यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

रेबीज नियंत्रणात गोवा देशात अव्वल राज्य ठरले आहे. जागतिक रेबीज दिनानिमीत्त काल ता.२८ सप्टेंबर रोजी रेबीज जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलेला असून या उपक्रमाचे उदघाटन कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सचिव कुलदीप सिंग यांनी केले. यावेळी रेबीज जागृती वाहनांना झेंडा दाखवण्यात आला.

१७ मे २०२१ रोजी गोवा सरकारने (Goa Govt) काढलेल्या अधिसुचेननुसार गोवा रेबीज नियंत्रणात (Goa Rabies Control) देशात अव्वल ठरले असून कुत्र्यांना न मारता फक्त त्यांना लस देऊन रेबीज नियंत्रणात आणण्यात आल्याचे डॉ. अप्पुपिलाई यांनी या पत्रकात म्हटले आहे. २०१४ पासून गोव्यात १७ व्यक्ती रेबीजमुळे दगावल्या आहेत. गेल्या तीन वर्षात ही संख्या शुन्य आहे. असे सांगून लोकांनी रेबीज जागृती उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. अप्पुपिलाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT