Goa Budget Session | Congress MLAs wore black clothes Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session : राहुल गांधींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभापतींनी फेटाळला

काँग्रेस आमदारांनी परिधान केले काळे कपडे

दैनिक गोमन्तक डिजिटल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या अपात्रतेच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह पक्षाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्‍टा यांनी आज सोमवारी अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवशी काळे कपडे परिधान करून सभागृहात प्रवेश केला.

दरम्‍यान, आलेमाव यांनी एकता, अखंडता, शांतता, सौहार्दाचा संदेश देणारी तसेच बेरोजगारी आणि महागाईवर लोकांच्या तक्रारी ऐकून घेत कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन करणारा अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सभापतींनी नामंजूर करत फेटाळून लावला.

प्रश्‍‍नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच सभापतींनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला तेव्हा युरी आलेमाव यांनी, देशाला एकसंध ठेवण्याच्या ध्येयाने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 4 हजार किलोमीटर चालणे गुन्हा आहे का? असा सवाल करुन सभापतींकडे निषेध नोंदवीला.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही सभापतींना सदर प्रस्ताव दाखल करून घेण्याची विनंती केली. सत्य बोलणारे आणि भाजप सरकारचा क्रोनी कॅपिटलिस्ट अजेंडा उघड करणारे राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. निषेधाचे प्रतीक म्हणून आम्ही तिघांनीही आज काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत, असे आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT