Vasco Crime News Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime News: वास्कोतील डॉक्टर सासऱ्याचा खून केलेल्या जावयाची 14 वर्षानंतर होणार तुरूंगातून सुटका

सुप्रीम कोर्टाचा निवाडा :18 वर्षापूर्वीची घटना; कोर्टाने ठोठावली होती जन्मठेप

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vasco Crime News: वास्को येथील डॉ. श्रीकांत वेरेकर यांच्या खूनप्रकरणातील आरोपी जावई रायन फर्नांडिसची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. त्याची पूर्वसुटका केल्यास त्याचे कुटुंब त्याला स्वीकारण्यास तयार असल्याचे पोलिसांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे न्यायालयाने हा निवाडा दिला. खुनाची घटना 18 वर्षांपुर्वी 2005 मध्ये घडली होती.

सत्र न्यायालयाने त्याला 2007 मध्ये फाशीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये त्याची ही शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

सासराच्या खूनप्रकरणी कोलवाळ येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी रायन फर्नांडिस याने सुटकेसाठी अर्ज केला होता. गृह खात्याच्या पूर्वसुटका समितीने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्याला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

14 वर्षे शिक्षा भोगलेल्या आरोपींबाबत वर्तणुकीवरून त्यांच्या पूर्वसुटकेसाठी गृह खात्याकडे यादी पाठवली जाते. त्यावर पूर्वसुटका समिती निर्णय घेते. रायन फर्नांडिस याला कारागृहात 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्याविरुद्ध कारागृहात गुन्हेगारी कारवायाचा ठपका नाही.

तरीही त्याचा पूर्वसुटका अर्ज फेटाळला होता. समितीने फेटाळलेला हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून त्याची सुटका कऱण्याचे निर्देश दिले.

रायन फर्नांडिस याने डॉ. वेरेकर यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलीशी नोंदणी विवाह केला होता. पण हा विवाह अपयशी ठरला. काही दिवसांनी वेरेकर यांची मुलगी घरी परतली. त्यामुळे रायन व डॉ. वेरेकर यांच्या शत्रुत्व निर्माण झाले.

रायन पत्नीला आणण्यास गेला असता डॉ. वेरेकर यांनी त्याला हाकलून लावले. डॉ. वेरेकर हे 17 जानेवारी 2005 रोजी मॉर्निंग वॉकला गेले असता रायने याने त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा गळा दाबून ठार केले. त्यांचा मृतदेह वेर्णा येथे निर्जनस्थळी टाकला.

गुन्ह्यामध्ये रायन याच्यासह फ्रांसिस्को ऊर्फ फ्रांसिस ग्रेगोरिओ पॉल डिसोझा, राजेंद्र ऊर्फ राजन सिंग व सचिन परब तसेच प्रथमेश गदगकर याना अटक झाली होती. गदगकर माफीचा साक्षीदार झाल्याने त्याची सुटका झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT