government employees salary to increase hugely under the new formula Dainik Gomantak
गोवा

सरपंच, उपसरपंचांचे मानधन चौपटीने वाढणार?

पंचायत संचालनालयाने पाठविली अर्थ खात्याकडे फाईल

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील सरपंच आणि उपसरंपच यांचे मानधन वाढवावे, अशी अनेक वर्षांची मागणी मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. पंचायत संचालनालयाने वाढीव मानधनाची फाईल अर्थ खात्याकडे पाठविली असून, त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यास सरपंचांना सध्या मिळणाऱ्या 6 हजार रुपयांवरून ते वाढून 25 हजारांपर्यंत जाणार आहे, असल्याची माहिती हाती आली आहे.

राज्यात 191 पंचायती आहेत. त्यात सरपंच आणि उपसरपंच असे मिळून 382 पदे होतात. सरपंच-उपसरपंचांचे मानधन वाढल्यानंतर आपोआपच सदस्यांचेही मानधन वाढणार आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती.

पंचायत संचालनालयाच्या संचालक सिद्धी हळर्णकर यांनीही नुकतीच एका कार्यक्रमात या माहितीला दुजोराही दिला आहे. उपसरपंचांना मिळणाऱ्या मानधनातही भरघोस वाढ होणार आहे. सध्या उपसरपंचास 4 हजार 500 रुपये मानधन मिळते, ते वाढून 20 हजारांवर जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT