Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Mining in Goa: उर्वरित 86 खनिज ब्लॉकचा मार्चपर्यंत लिलाव करणार- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

खाण ब्लॉक बोलीदार कंपन्यांना इंटेन्ट पत्रांचे वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

Mining in Goa: खाण व्यवसाय बंद झाल्यापासून सरकारवर अनेक आरोप झाले. मात्र, सरकार डगमगले नाही. उलट खाणी सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरूच ठेवले.

सरकारच्या प्रयत्नांना आता यश आले असून पुढील पन्नास वर्षांचा विचार करून राज्यात स्वयंपोषी खाण व्यवसाय सुरू करणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज साखळी येथे व्यक्त केले.

येत्या मार्च महिन्यापर्यंत राज्यातील उर्वरित (86) खनिज ब्लॉकचा लिलाव करून खाण व्यवसायाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेतील चार यशस्वी बोलीदार कंपन्यांना इन्टेन्ट (इरादा) पत्रांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

खाण आणि भूगर्भ खात्यातर्फे रवींद्र भवनात आयोजिलेल्या या सोहळ्यावेळी राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार गणेश गावकर, प्रेमेंद्र शेट, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम, खाण आणि भूगर्भ खात्याचे संचालक सुरेश शानभोग, बांदेकर कंपनीचे मालक नाना बांदेकर उपस्थित होते.

खाणबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेले असतानाही राज्याच्या विकासावर परिणाम होणार नाही याची सरकारने काळजी घेतली. संकटकाळात सरकारने आर्थिक योजनाही चालूच ठेवून जनतेला तारले, असे सुभाष फळदेसाई म्हणाले.

खाण कंपन्यांनी कोणताही बेकायदेशीर व्यवसाय केलेला नाही, तर तत्कालीन सरकारच्या चुकीमुळे खाणी बंद झाल्या, असे नाना बांदेकर म्हणाले. विनय तेंडुलकर, गणेश गावकर आणि प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी विचार मांडले.

  • कामगारांवर अन्याय नको!
    खाणी सुरू करताना संबंधित खाण कंपन्यांनी पूर्वाश्रमीच्या कामगारांवर अन्याय करता कामा नये. शक्य त्याप्रमाणे या कामगारांना पूर्वीच्याच हुद्यावर सामावून घ्यावे. ट्रकांनाही काम द्यावे. खाणी बंद करण्यासाठी खाणविरोधी संघटना पुन्हा टपून बसणार आहेत.

    पुन्हा संकट टाळण्यासाठी खाण व्यवसायात कोणतेही विघ्न येता कामा नये. त्यासाठी विशेषत: खाणग्रस्त भागातील लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT