Rajendra Arlekar Dainik Gomantak 
गोवा

आमदारांचे खरे काम चांगले कायदे करणे : राजेंद्र आर्लेकर

विधानसभा कार्यपद्धतींचा अभ्यास गरजेचा

दैनिक गोमन्तक

पणजी : आमदाराचे खरे काम कायदे बनविणे आणि चांगले कायदे करणे हे असते. त्यामुळे त्यांनी विधानसभा कार्यपद्धतींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल व गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

गोवा विधानमंडळ सचिवालय आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने राजधानीत गोव्यातील आमदारांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते म्हणून बोलत होते.

आर्लेकर यांनी एखादा आमदार जेव्हा सभागृहात असतो, तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्या विधानसभेतील कामगिरीकडे असते. जेव्हा आम्ही उमेदवारांना कोणत्याही कामासाठी नियुक्त करतो तेव्हा त्यांच्याकडे त्यांचा अनुभव आणि पात्रता विचारतो. मात्र, आमदाराकडे आवश्यक प्रशिक्षण आहे का असे कोणीही विचारत नाही. आमदारांनाही प्रशिक्षणाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यपद्धतीचे पुस्तक ग्रंथाप्रमाणे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सभापती आणि गोवा विधानसभेचे अभिनंदन करताना सांगितले, की केवळ काही लोकच सभागृहाच्या कामकाजाचे नियम आणि कार्यपद्धती वाचतात. डॉ. सावंत म्हणाले, की एखाद्या आमदाराला यशस्वी व्हायचे असेल, तर हे कार्यपद्धतीचे पुस्तक पवित्र ग्रंथासारखे आहे.

कामकाजाचा अभ्यास हवाच

सभापती रमेश तवडकर म्हणाले, की समाजासाठी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे अनेक आमदार निवडून येतात. मात्र, क्षेत्रिय कार्य करणे आणि विधानसभेत काम करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लोकांच्या आमदाराकडून खूप अपेक्षा असतात आणि या लोकांना सेवा देण्यासाठी आमदारांनी सभागृहाच्या कामकाजाची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT