The project under PM Gati Shakti will be a boon for Goa tourism Dainik Gomantak
गोवा

पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत प्रकल्प गोव्याच्या पर्यटनासाठी ठरणार वरदान

मुरगाव बंदर प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष राजीव जलोटा यांचे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

वास्को : पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत हाती घेण्यात आलेले आधुनिक आंतरराष्ट्रीय देशांतर्गत क्रूझ टर्मिनल व तरंगत्या जेटी इत्यादी प्रकल्प राज्याच्या पर्यटनासाठी एक वरदान ठरणार असल्याचे मुरगाव बंदर प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष राजीव जलोटा यांनी आभासी पध्दतीने पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. मुरगाव बंदराला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी पीपीपी तत्त्वावर यांत्रिकी लोहखनिज हाताळणी टर्मिनल विकसित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. बार्तालाप कार्यक्रमाला डेप्युटी चेअरमन गुरुप्रसाद राय यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (The project under PM Gati Shakti will be a boon for Goa tourism)

संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान गती शक्तीच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनची उद्दिष्टे अधोरेखित केली. गती शक्ती हे सोळा मंत्रालयाच्या समन्वयसाठी एक समान व्यासपीठ आहे. इत्यादीच्या पायाभूत प्रकल्पांच्या जलद अमलबजावणीसाठी व देशाच्या जलद आर्थिक वाढीचसाठी रेल्वे, रस्ते, बंदर विमानतळ, जलमार्ग, मल्टीमॉडल व लॉजिस्टिक ही सात इंजिने आहेत. ज्यामुळे कामे त्वरित होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफस्पेस अप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉमॅटिक्सने सोळा मंत्रालयासाठी एक पोर्टल तयार केले आहे. जे उपग्रह प्रतिमांद्वारे मंत्रालये व विभागांमध्ये समन्वक साधते. विविध स्तरांचे मॅपिंग करण्यासाठी एक समान व्यासपीठ आहे. शावत विकासासह रोजगार, शेवटच्या टोकापर्यंत कनेक्टिव्हिटीला चालना देणे, एकात्मिक नियोजनासह लॉजेस्ट्रिक खर्च सध्याच्या जीडिपीच्या १३-१४७-८ टक्यांवर आणणे हे समान व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. असे ते म्हणाले.

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या पूर्ण झालेल्या,चालू असलेल्या व कार्यान्वित असलेल्या प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय देशांतर्गत क्रूझ टर्मिनलच्या विविध सुविधांची त्यांनी माहिती दिली. राज्यातील नद्यांच्या जाळ्याचा फायदा घेऊन क्रूझ टर्मिनलशेजारी सुनियोजित रोपॅक्स व फेरी सेवांसह पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. पणजी, जुने गोवा येथे तरंगत्या जेटी सुरु करण्याबाबत त्यांनी प्रकाशझोत टाकला. यामुळे नदी क्रूझला व स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरगाव बंदरातून निर्यात होणारया लोहखजिनची हाताळणी करण्यासाठी पीपीपीतत्त्वावर धका क्रमांक ९ चा तसेच तीन बार्ज जेटींचा पुनर्विकास करण्याचे नियोजन केले जात आहे. टर्मिनलचे ८४२ कोटी रूपये खर्चून पूर्णपणे यांत्रिकीकरण करण्यात येणार आहे. वार्षिक बारा दशलक्ष मेट्रिक टनच्या क्षमता वाढीसह हे टर्मिनल राज्यातील खाण उद्योग, बार्ज व्यवसाय, तसेच लघु व मध्यम व्यवसायांसाठी वरदान ठरणार असल्याचे ते म्हणाले.

अलिकडेच कार्यान्वित करण्यात आलेल्या वरुणपुरी ते सडा चौकपर्यंतच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गामुळे ट्रक, लॉरी, व इतर अवजड वाहने शहर भागाऐवजी या महामार्गावरून धावणार आहेत. त्यामुळे शहर भागातील रस्त्यावरील ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT