Vote  Dainik Gomantak
गोवा

बॅलेटद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया गोव्यात सुरू

बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी रविवारी अनेक ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) उत्सुक होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींसाठी मतदान सोयीचे व्हावे या दृष्टिकोनातून संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन बॅलेटद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी रविवारी अनेक ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) उत्सुक होते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. (Goa Election 2022 News)

मतदान कर्मचार्‍यांना मतदारांच्या (Voters) तपशीलांची पडताळणी करणे, मताच्या गोपनीयतेसाठी कार्डबोर्ड विभाजन सेट करणे आणि बॅलेटवर मतदान कसे करावे याबद्दल स्पष्ट सूचना देणे, अशी अनेक कामे करावी लागत होती. "आम्हाला प्रक्रियेचे पालन करावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असून यात घाई करता येत नाही," असे मतदान कर्मचार्‍यांनी सांगितले.

ज्या लोकांना मतदानासाठी (Voting) रविवारी सकाळी 11 ची वेळ दिली होती. त्यापैकी अनेक लोकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. बॅलेटद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया वाळपई मतदारसंघात सुरू करण्यात आली आहे. सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील वय वर्ष 80 वरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT