Elections Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. सोमवारी 15 उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या 21 झाली आहे. शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने एकही अर्ज स्वीकारण्यात आला नाही. (Goa Assembly Election 2022)

28 जानेवारीला निवडणूक अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. दरम्यान, 26 तारखेला प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सार्वजनिक सुट्टी आहे. यामुळे शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार, असे चित्र दिसत आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या (BJP) तिकीटावर सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर मगोपच्या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय पाच अपक्ष आणि दोन काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांनीही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपली कागदपत्रे सादर केली आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी असून 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्चला जाहीर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT