Private Exhibition  Dainik Gomantak
गोवा

नगरपालिकेच्या इशाऱ्यानंतर खासगी प्रदर्शन आयोजकांनी भरली थकबाकी

लाखो रुपयांची थकबाकीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा

दैनिक गोमन्तक

मडगाव : पालिकेने घालून दिलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जमीन व्यापूनही पालिकेचा अतिरिक्त कर भरण्यास नकार देणाऱ्या खासगी प्रदर्शनावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर आयोजकांनी सायंकाळ पर्यंत लाखो रुपयांची थकबाकीची रक्कम जमा केली.

एसीजीपीडीए मैदानावर हे प्रदर्शन भरले असून या आयोजकांनी एका ठराविक जागेत हे प्रदर्शन भरविणार असे सांगून परवानगी घेतली होती. मात्र त्यापेक्षा तीन पटीने अधिक जागा व्यापली होती. त्यामुळे या आयोजकांनी अतिरीक्त पैसे भरावे असे सांगूनही ती रक्कम न भरल्याने शेवटी मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत रक्कम न भरल्यास हे प्रदर्शनं बंद केले जाईल अशी नोटीस जारी केली होती. यानंतर शेवटी आयोजकांनी ही रक्कम भरली.

मुख्याधिकारी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार एसीजीपीडीए मैदानावरील या प्रदर्शनातून पालिकेला 15 लाखांचे उत्पन्न मिळाले असून फेरीतील अन्य दुकानदाराकडून 14 लाख असा एकूण 29 लाख रुपये वसूल केले आहेत. मागच्या वर्षी फेरीतून पालिकेला फक्त 4 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 लिलाव! 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; 'या' स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री, मोठी बोली लागणार?

Goa Drug Case: 'एलएसडी' प्रकरणातील फरार संशयिताला बंगळुरूत अटक, चार दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

Lairai Jatra Stampede: सात महिन्यांनंतरही संबंधितांवर कारवाई नाही! लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत 6 भाविकांनी गमावला होता जीव

Goa Nightclub Fire: राज्यातील सर्व नाईट क्लबचे करणार 'ऑडिट', मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

IND vs SA: ना सूर्यकुमार ना गिल दक्षिण आफ्रिकेला वाटते या फलंदाजाची भीती, खास प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT