Goa live music Christmas Dainik Gomantak
गोवा

सुरांचा ताल की संकटांचा काळ? गोव्यात नाताळच्या हंगामात संगीतकारांची मोठी ओढाताण

Goa bands Christmas: वाढती स्पर्धा, रात्री १० वाजेपर्यंतची वेळेची मर्यादा आणि मानधनावरून होणारी घासाघीस यामुळे अनेक नामवंत बँड्सना कसरत करावी लागतेय

Akshata Chhatre

live bands Goa Christmas: नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला असून लाइव्ह म्युझिकला मोठी मागणी आहे. मात्र, या 'पीक' सीझनमध्ये गोव्यातील संगीतकारांचे आयुष्य केवळ सुरांनी सजलेले नाही, तर ते अनेक समस्यांशी झुंजत आहेत. वाढती स्पर्धा, रात्री १० वाजेपर्यंतची वेळेची मर्यादा आणि मानधनावरून होणारी घासाघीस यामुळे अनेक नामवंत बँड्सना कसरत करावी लागतेय.

ट्रॅफिक जॅम आणि वेळेचा अडथळा

पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि परिणामी होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे ते नाताळच्या आठवड्यात सादरीकरण करणे टाळतात. तसेच काही ठिकाणी रात्री १० वाजता कार्यक्रम बंद करावे लागत असल्याने आणि प्रेक्षक उशिरा येत असल्याने सादरीकरणासाठी खूप कमी वेळ मिळतो.

मानधनावरून जोरदार 'बार्गेनिंग'

गोव्यात लाइव्ह म्युझिकच्या ठिकाणांची संख्या मोठी आहे, तितकेच कलाकारही उपलब्ध आहेत. यामुळे हॉटेल्स आणि आयोजक मानधनासाठी मोठी घासाघीस करतात. काही बँड्सनी आपले दर २ लाखांवरून थेट ४ लाखांवर नेले आहेत, तर दुसरीकडे डीजेमुळे लाइव्ह बँड्सच्या उत्पन्नावर परिणाम होतोय. आता डान्स बँड्सपेक्षा तरुणांची डीजेला अधिक पसंती मिळतेय.

बदलत्या प्रेक्षकांची मागणी

प्रेक्षकांना आता केवळ गाणी नकोत, तर नवीन म्युझिक, उत्तम व्हिज्युअल्स आणि त्या बँडची यूट्यूबवर उपस्थिती हवी असते. तर दुसऱ्या बाजूला हडफडे येथील अग्नितांडवासारख्या घटनांनंतर हॉटेल मालक सुरक्षिततेचे कारण सांगून बँड्सचे बजेट कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT