Food Court  Dainik Gomantak
गोवा

Curchorem News : पालिका बैठकीत 'फूड कोर्ट स्‍टॉल’ची किंमत ठरली, एका स्टॉलसाठी मोजावी लागणार 'एवढी' रक्कम

कुडचडे येथे फूडकोर्टचे उद्‌घाटन होऊन बरेच महिने उलटले तरी गाडेधारकांना यात स्थलांतरित करण्यात आले नव्हते

गोमन्तक डिजिटल टीम

कुडचडे येथे फूडकोर्टचे उद्‌घाटन होऊन बरेच महिने उलटले तरी ऑम्लेट व भेळपुरी गाडेधारकांना अद्याप या फूडकोर्टमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले नव्हते.

साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात गाडेधारकांना कधी सामावून घेणार? असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत होता.

मात्र आता हा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. पुन्‍हा एकदा आज नगरपरिषदेने याची फेरनिविदा केली असून प्रत्‍येक स्‍टॉलची किंमत 5 हजार केली आहे.

कुडचडेत दरवर्षी विक्री प्रदर्शन व्हावे की नाही यावर वारंवार मतभेद होते, या प्रश्र्नावर दरवर्षी कुडचडेत दोनदा विक्री प्रदर्शन होणार असा ठराव कुडचडे पलिकेत एकमताने मंजूर करण्यात आल्‍याचे सांगण्‍यात आले.

‘फूड कोर्ट’, नगरपालिकेच्‍या नवीन इमारतीतील दुकानांच्‍या फेरनिविदेचा विचार तसेच कुडचडे काकोडा नगरपालिकेचे मुख्‍य अधिकारी यांना जी 20 साठी अतिरिक्‍त ड्यूटीच्‍या प्रश्‍‍नावरही चर्चा करण्‍यात आली.

कुडचडे-काकोडा नगरपालिकांच्‍या सर्वसाधारण बैठकीत उपस्‍थित स्‍थानिक आमदार तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल म्‍हणाले, की कुडचडेत ‘फूड कोर्टचा’ विषय मुख्‍य आहे.

‘फूड कोर्ट स्‍टॉल’साठी सहा हजार अशी प्रत्‍येक स्‍टॉलसाठी निविदा ठेवली होती. पुन्‍हा एकदा आज नगरपरिषदेने याची फेरनिविदा केली असून प्रत्‍येक स्‍टॉलची किंमत 5 हजार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT