Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : पर्यटन खात्याची धोरणे समुद्र किनारा कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालणारी

विजय सरदेसाई यांचा आरोप; धोरणे मच्छीमारावर थोपल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

सुशांत कुंकळयेकर

Vijai Sardesai : गोवा सरकारचे नवे जेटी धोरण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गोव्याचे समुद्र किनारे कॉर्पोरेट कंपन्यांना आंदण देण्याचा डाव असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. दक्षिण गोव्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी आज सोमवारी विजय सरदेसाई यांची भेट घेऊन पर्यटन खत्याचे नियोजित धोरण विनाअट स्वीकारण्याची लेखी हमी दिल्या शिवाय त्यांना व्यवसाय करता येणार नाही अशी सक्ती करत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांना केली.

यावेळी बोलताना, सरदेसाई म्हणाले, जे धोरण अजून तयारच झालेले नाही त्यावर जे सरकार आगावू हमी कशी मागू शकते असा सवाल केला. हे धोरण स्थानिक व्यावसायिकांवर थोपविण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असा इशाराही त्यांनी दिला. ही अशा प्रकारची धोरणे आणून जर गोव्यातील मच्छीमाराकडे असलेले व्यवसाय जर हे सरकार कॉर्पोरेट कंपन्याकडे देऊ पाहत असेल तर त्या विरोधात आमचा गोवा फॉरवर्ड पक्ष न्यायालयात जाणार असा इशारा दिला.

जर पोलीसांना आणून या व्यावसायिकावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यांवरही उतरू असा इशारा त्यांनी दिला. आज समुद्र किनाऱ्यावरील सगळेच व्यवसाय दृष्टीच्या हाती देऊ पाहतात असा पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्यावर आरोप करताना विरोधात असताना खवंटे याच कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. आता या कंपनी बद्दलचे त्यांचें मत बदलले का असा सवाल सरदेसाई केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT