Siloim Robbery Attempt Dainik Gomantak
गोवा

Siolim Crime: वाल्लोर! घरात घुसलेल्या चोराला भिडला, वार सहन केले.. पण घाबरला नाही; शिल्लोरच्या तरुणाने हाणून पाडला डाव

Siloim Robbery Attempt: चोराने केलेल्या हल्ल्यात साईला दुखापत झाली असली तरी त्याने दाखवलेल्या धाडसामुळे चोरट्याला रिकाम्या हातीच पळ काढावा लागला.

Akshata Chhatre

Siolim Robbery Attempt Thief Attack Teenage Youth

म्हापसा: शिवोलीतील किशोरवयीन तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे एक चोराला रिकाम्या हातील पळ काढावा लागला. साई रेवाडकर असे धाडसी मुलाचे नाव असून तो तारचीभाट शिवोली येथे राहतो. त्याच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत असले तरी दिवसाढवळा घडलेल्या या घटनेनं गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत

शनिवारी सकाळी 11:30 च्या सुमारास साई कॉलेजमधून घरी परतला. घरातल्या एका खोलीत हालचाल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तो खोलीत गेला असता सशस्त्र चोरट्याने त्याच्यावर हल्ला केला. चोरट्याच्या हल्ल्याने साई घाबरला नाही. त्यानेही चोरट्याला प्रतिकार केला.

साईने प्रतिकार केल्याने चोरट्याने शेवटी चाकूने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात साईला दुखापत झाली पण तो मागे हटला नाही. त्याने चोरट्याला अक्षरश: सळो की पळो करून सोडले. त्याच्या धाडसामुळे शेवटी चोरट्याला माघार घ्यावी लागली आणि साईने चोरट्याचा हा डाव हाणून पाडला. साईने दाखवलेल्या धाडसाची सगळीकडे प्रशंसा केली जात आहे आणि सोबतच अशा चोर आणि दरोडेखोरांपासून स्थानिकांनी सतर्क राहण्याची गरज वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT