बारदेस सुकुर पंचायत पंचायतीचे माजी सरपंच तथा उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद गजानन अस्नोडकर  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील जनता सुशिक्षित आहे ते योग्य पक्षाला आपला कौल देतील; अस्नोडकर

पर्वरीतील सुशिक्षित जनता प्रंतप्रधान मोदी यांना केंद्रात बळकट करण्यासाठी गोव्यात भाजप सरकार बहुमत प्राप्त करणार असल्याची माहिती शेवटी उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Dabolim: भारत (India) देश लोकशाही प्रधान असल्याने येथे कोणताही पक्ष निवडणूक (Elections) लढवू शकतो. मात्र गोव्यातील (Goa) जनता सुशिक्षित असल्याने ते योग्य पक्षाला आपला कौल देतील. भारतीय जनता पक्षात (BJP) मी निष्ठावंत कार्यकर्ता असून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे कुशल प्रशासन व राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना घेऊन गोव्याचा विकासाच्या मार्गाने नेऊन पक्ष बळकट केला आहे. यात महत्त्वाचा वाटा राज्य सरकारला लाभला तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात पूर्ण बहुमत प्राप्त करतील असे प्रतिपादन बारदेस सुकुर पंचायत पंचायतीचे माजी सरपंच तथा उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद गजानन अस्नोडकर (Mahanand Gajanan Asnodkar) यांनी केले.

गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या केंद्रीय पक्षाबरोबर राज्यातील पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच इतर राज्यातील पक्षांनी सुद्धा गोव्यात येऊन आपल्या पक्षाची रणनीती करण्यास सुरुवात केली आहे. पण गोव्यातील जनता सुशिक्षित असून ते आपला कौल विकासाबरोबर जनतेच्या गरजा पुरवणाऱ्या पक्षाला कौल देणार अशी माहिती उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी दिली. बार्देश तालुक्यातील पर्वरी सुकुर पंचायतीत 1992 साली भाजपचा उमेदवार प्रथमच पंच निवडून येऊन महानंद अस्नोडकर याने सुकुर पंचायतीबरोबर संपूर्ण पर्वरीचा विकास साधण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. यात त्यांना बहुमूल्य योगदान लाभले ते केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून अस्नोडकर यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे प्रशासन जवळूनच पाहण्याचे योगदान मिळाले हे माझे भाग्य समजतो असे अस्नोडकर यांनी सांगितले.

बारदेस पर्वरी येथील रहिवासी महानंद गजानन अस्नोडकर याने सुकुर पंचायतीत तीन वेळेला पंच म्हणून निवडून येऊन अनेक वेळा सरपंचपद भूषविले आहे. यात त्याने सुकुर पंचायतीला विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्यास महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. सुकुर पंचायतीचे सरपंचपद भूषविताना अस्नोडकर यांना राज्य भाजप सरकारच बहुमूल्य योगदान लाभले. हळदोणा माजी भाजप आमदार उल्हास अस्नोडकर यांचे महानंद चुलत बंधू असून त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. तसेच महानंदा अस्नोडकर यांनी सुकुर पंचायतीत आपल्या पत्नीला सुद्धा बहुमताने पंच म्हणून निवडून आणले आहे. पर्वरीचा विकास एवढेच ध्येय आपल्या मनात ठेवून अस्नोडकर यांनी कार्य केले आहे. पर्वरी मतदार संघात सुकुर पंचायती बरोबर पेन्ह दी फ्रान्स व साल्वादोर दी मुंद पंचायतीचा सहभाग असून अंदाजे 26 हजार मतदार आहे.

गेल्या दहा वर्षात पर्वरी मतदारसंघाला विकासापासून स्थानिक लोकप्रतिनिधीन पंचवीस वर्षे मागे टाकलेले आहे. येथील युवकांना नोकरी देण्यापासून वंचित ठेवणे, पर्वरीत युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना मैदाने बांधून देण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहे. पर्वरीतील जनतेचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी, त्यात सुद्धा हा लोकप्रतिनिधी अपयशी ठरला ठरलेला आहे. संपूर्ण पर्वरीत भू गटार वाहिन्या जोडणी केल्या असून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा मलनिस्सरण प्रकल्प उभारण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरला आहे. भाजप सरकार मध्ये अंदाजे अडीच वर्षे मंत्रीपद देऊनसुद्धा पर्वरीला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता योग्य जागा दाखवणार असल्याची प्रतिक्रिया महानंद अस्नोडकर यांनी दिली. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाने माझ्यावर उत्तर गोव्याची जबाबदारी दिल्याने मी ती पूर्णपणे निभावणार असल्याची माहिती अस्नोडकर यांनी दिली. यंदा पर्वरी मतदार संघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलणार असून यात महत्त्वाची भूमिका बजावणार.

पर्वरीतील सुशिक्षित जनता प्रंतप्रधान मोदी यांना केंद्रात बळकट करण्यासाठी गोव्यात भाजप सरकार बहुमत प्राप्त करणार असल्याची माहिती शेवटी उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी दिली.कोरोना महामारीत गोवा राज्य आर्थिक व्यवस्था कुमकुवत असूनसुद्धा मुख्यमंत्री डॉ. सावंत याने राज्यातील योजना विकासाला अडथळा निर्माण होऊ दिला नाही. बारदेस पर्वरी येथील रहिवासी महानंद गजानन अस्नोडकर याने सुकुर पंचायतीत तीन वेळेला पंच म्हणून निवडून येऊन अनेक वेळा सरपंचपद भूषविले आहे. यात त्याने सुकुर पंचायतीला विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्यास महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. सुकुर पंचायतीचे सरपंचपद भूषविताना अस्नोडकर यांना राज्य भाजप सरकारच बहुमूल्य योगदान लाभले. हळदोणा माजी भाजप आमदार उल्हास अस्नोडकर यांचे महानंद चुलत बंधू असून त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. तसेच महानंदा अस्नोडकर यांनी सुकुर पंचायतीत आपल्या पत्नीला सुद्धा बहुमताने पंच म्हणून निवडून आणले आहे.

पर्वरीचा विकास एवढेच ध्येय आपल्या मनात ठेवून अस्नोडकर यांनी कार्य केले आहे. पर्वरी मतदार संघात सुकुर पंचायती बरोबर पेन्ह दी फ्रान्स व साल्वादोर दी मुंद पंचायतीचा सहभाग असून अंदाजे 26 हजार मतदार आहे. गेल्या दहा वर्षात पर्वरी मतदारसंघाला विकासापासून स्थानिक लोकप्रतिनिधीन पंचवीस वर्षे मागे टाकलेले आहे. येथील युवकांना नोकरी देण्यापासून वंचित ठेवणे, पर्वरीत युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना मैदाने बांधून देण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहे. पर्वरीतील जनतेचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी, त्यात सुद्धा हा लोकप्रतिनिधी अपयशी ठरला ठरलेला आहे. संपूर्ण पर्वरीत भू गटार वाहिन्या जोडणी केल्या असून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा मलनिस्सरण प्रकल्प उभारण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT