Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यातील सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 227 वर

दिवसभरात 'इतक्या' नव्या रूग्णांची भर

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Corona Update: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 32 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर उर्वरीत बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नव्याने भर पडलेल्या रूग्णसंख्येने राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या आता २२७ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाची धास्ती वाढू लागली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये एकूण 337 चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण 17 रूग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तर कोरोनामुक्तीचा दर 98.37 टक्के इतका झाला.

राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 58 हजार 271 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 59 हजार 52 रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 281 रूग्ण बरे झाले. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4013 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने टी-20 मध्ये रचला इतिहास, कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला; मॅक्सवेललाही पछाडलं

SCROLL FOR NEXT