DGP Jaspal Singh  Dainik Gomantak
गोवा

Goa Police : लोकसंख्येच्या तुलनेत राज्यातील अपघातांचे प्रमाण अधिक

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित उपकरणांचा वापर करण्याच्या पर्यायाची शक्यता पडताळणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Police : गोव्यातील लोकसंख्या पाहिल्यास राज्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बरेच मोठे आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असून त्यासाठी व्यापक मोहीम हातात घेतली जाईल.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर करण्यासाठी भविष्यात स्वयंचलित उपकरणांचा वापर करण्याच्या पर्यायाचीही शक्यता पडताळून पाहणार आहोत, असे महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले.

गोव्यात जानेवारी महिन्यात 30 जणांना अपघाती मृत्यू आले. फेब्रुवारीतही बरेच अपघात झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज महासंचालकांनी दक्षिण गोव्यातील वाहतूक पोलिस आणि विभागीय उपअधीक्षक यांच्याबरोबर बैठक घेतली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक टिपणारे कॅमेरे बसविण्याचा पर्याय सरकारला खात्याने सुचविला आहे, असे सिंग यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर तसेच हेल्मेट आणि सीटबेल्ट न घालता वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

गोव्यात यापुढे जी-20च्या परिषदा होणार आहेत. त्यासंबंधीच्या सुरक्षेबद्दल कोणते उपाय घेतले जाणार असे विचारले असता त्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांबरोबर नियमित बैठका चालू असतात, अशी माहिती सिंग यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT