Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: नवे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे पर्यावरण तसेच कायदा व न्याय ही खाती येणार

Goa Politics: साबांखा मुख्यमंत्र्यांकडेच : अधिसूचना आज होणार जारी

दैनिक गोमन्तक

Goa Politics: नवे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे पर्यावरण तसेच कायदा व न्याय ही खाती सोपवण्यात येणार आहेत. माजी मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे असलेली विधिमंडळ कामकाज व सार्वजनिक बांधकाम ही खाती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्याकडेच ठेवणार आहेत.

सिक्वेरा यांच्याकडे तिसरे खाते सोपवण्यात येणार आहे. मात्र, त्याविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही. सिक्वेरा यांना खातेवाटप केल्याची अधिसूचना उद्या (बुधवारी) जारी करण्यात येणार आहे.

सिक्वेरा हे गुरुवारी मंत्रालयात पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा ताबा घेणार आहेत. बुधवारी सायंकाळपासून त्या कार्यालयाचे सुशोभीकरण करणे सुरू केले जाणार आहे. अद्याप सिक्वेरा यांनी आपल्या व्यक्तिगत कर्मचाऱ्यांची यादी सर्वसाधारण

सिक्वेरांना पर्यावरण, कायदा व न्याय

प्रशासन खात्याकडे त्यांच्या नियुक्तीसाठी सोपवलेली नाही. त्यांना एक विशेष कार्य अधिकारी, एक व्यक्तिगत सचिव, दोन व्यक्तिगत साहाय्यक, दोन कार्यालयीन साहाय्यक असे कर्मचारी नेमता येणार आहेत.

खाजन जमीन ठरणार त्रासदायक

विशेष म्हणजे, पर्यावरणविषयक कायद्याची कलमे सिक्वेरा यांना मुखोद्‍गत आहेत. त्यांच्याकडे पर्यावरण खाते सोपवण्यात येणार असल्याने नव्या बोरी पुलासाठी खाजन जमीन संपादनाचा मुद्दा गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकऱणाच्या माध्यमातून त्यांनाच हाताळावा लागणार आहे. ते त्यांच्यासाठी कटकटीचे ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT