Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात 'या' दिवशी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागांत तापमानात अचानक घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढू लागली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमानात घट नोंदवली जात आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्यानुसार, उत्तर भारतात थंडी वाढण्याची तर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागांत तापमानात अचानक घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वास्तविक, दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे 5 डिसेंबरच्या सुमारास आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांत दाब निर्माण होईल. त्यानंतर ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकून 8 डिसेंबर रोजी तामिळनाडू पुडुचेरी किनार्‍याजवळ पोहोचण्याची दाट शक्यता आहे.तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटक अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण भागात हलका पाऊस पडेल. तसेच गोव्यात देखील 9 ते 12 डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गोव्यातील वातावरणात अचानक बदल जाणवू लागला आहे. काही ठिकाणी सर्दी-तापाचे रुग्ण देखील वाढत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर गोव्यात अवकाळी पाऊस बरसला तर सर्दी-तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT