Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

फोंडा पालिकेची बैठक ठरली वादळी...!

आरोपांच्या फैरी, सव्वा चार वर्षांत पहिलीच बैठक गाजली अन् लांबली, नगराध्यक्षांनी योग्यरीत्या हाताळली बैठक

दैनिक गोमन्तक

फोंडा : बऱ्याच काळानंतर फोंडा पालिकेत हमरीतुमरी दिसली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना काही नगरसेवकांनी फैलावर घेतल्याने आज (शुक्रवारी) झालेली बैठक वादळी ठरली. या पालिका मंडळातील सव्वा चार वर्षांच्या कार्यकाळातील हीच बैठक वादळी आणि सर्वाधिक वेळ घेणारी ठरली. बैठकीत गरमागरमी झाली तरीही आवश्‍यक ठराव घेण्यात आले, आणि मुख्य म्हणजे नगरध्यक्ष रितेश नाईक यांनी बैठक उत्तम प्रकारे हाताळली त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यातील काही विषय वादळी ठरले. विशेष म्हणजे सोपो कर गोळा करण्यासाठी लीलाव करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सध्या फोंडा पालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे हा सोपो कर गोळा केला जात असल्याने अपेक्षेप्रमाणे पालिकेला महसूल मिळत नाही. त्यामुळे सोपो करासंबंधी लीलाव करून पालिका क्षेत्रातील सोपो कर गोळा करण्याचा निर्णय झाला. यासंबंधीची कार्यवाही लगेच करण्यात येणार आहे.

फोंडा पालिकेची मालकी असलेल्या जुन्या इमारतीत सोळा निवासी फ्लॅट आहे, मात्र ही इमारत धोकादायक झाल्याने त्या ठिकाण नवीन वास्तू बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र त्यापूर्वी येथे राहणाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करण्याचा विषय चर्चेला आला असता त्या सर्वांना इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.

फोंडा पालिका क्षेत्रातील व्यावसायिक करात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यासंबंधी फोंडा बिझनेस फोरमतर्फे व्यापाऱ्यांनी एक निवेदन देऊन हा वाढीव कर कमी करण्याची मागणी केली होती. यासंबंधीचा विषयही चर्चेला आला.

बैठकीत या विषयावर चर्चा होऊन राज्यातील इतर पालिकांच्या व्यावसायिक कराशी तुलना करता फोंडा पालिकेचा व्यावसायिक कर कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यावर अधिक चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात येईल व निश्‍चितच कराच्या रकमेत कपात करण्यात येऊन व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

फोंडा पालिकेला ऑक्ट्रॉय कर मिळत नसल्याने निधीच्याबाबतीत मोठी अडचण भासते, त्याचा परिणाम विकासकामांवर तसेच पालिका कर्मचाऱ्यांच्या थेट पगारावर होत असल्याने पालिका प्रशासनाने एकरकमी मोठा निधी फोंडा पालिकेला उपलब्ध करावा यासंबंधी एक ठराव झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT