Yurli Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: प्रलोभनांना बळी पडू नका; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

Goa Politics: आलेमाव: जबरदस्तीने लादलेले प्रकल्प घातक ठरणार

दैनिक गोमन्तक

Goa Politics: मोपा विमानतळ, आयआयटी, फिल्म सिटी, तीन लिनियर प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी, थीम पार्क, ओल्ड गोव्यातील घोस्ट घरे, मरिना तसेच जबरदस्तीने लादलेले इतर प्रकल्प आपल्या भावी पिढ्यांना घातक ठरतील. गोमंतकीयांनी आताच शहाणे होऊन भाजप सरकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये. ‘गोंयकारांनो जायात जागे’, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

दाबोळी विमानतळावरील व्यवसायातील तीव्र घट, जुन्या गोव्यातील घोस्ट घरांना दिलेला क्रमांक, पेडणे येथील थीम पार्कसाठी दिलेली हरित जागा, निसर्गरम्य रिवण आणि काणकोण येथे आयआयटी आणि फिल्म सिटीसाठी दबाव आणण्याचे प्रयत्न,

पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचा गोंधळ अशा अनेक ताज्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी गोमंतकीयांना ‘उठा आणि गोवा वाचविण्यासाठी पुढे’, या अशी आर्त हाक त्यांनी दिली.

सविस्तर प्रकल्प अहवालाशिवाय तसेच गोवा आणि गोमंतकीयांना होणारा फायदा व नुकसानाचे मूल्यमापन व मूल्यांकन न करता जो प्रकल्प लादला गेला तो विनाशकारीच ठरल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले.

गोव्यातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार म्हणून मागील सरकारने झुआरी अॅग्रो केमिकल्सला प्रचंड जमीन सुपूर्द केली होती. आता सदर जमिनीतील शिल्लक जमीन आता रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते ज्याचा गोमंतकीयांना कोणताही फायदा नाही. या उदाहरणाचा धडा घेऊन पुढे पश्चात्ताप करण्यापेक्षा आताच शहाणे होणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण, जंगले आणि वन्यजीव नष्ट करून गोव्यावर प्रकल्प लादले जात आहेत.

कमिशन आणि किकबॅक घेऊन खालावलेल्या कामाच्या दर्जाच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, असे आलेमाव यांनी नमूद केले.

सतर्क राहण्याची गरज

मी गेल्या वर्षी गोवा विधानसभेत ‘घोस्ट एअरपोर्ट’चा मुद्दा उपस्थित केला होता. दाबोळी विमानतळाच्या व्यवसायात घट झाल्याची आकडेवारी समोर आल्याने माझ्या दावा खरा ठरला आहे. भाजपने निवडणुकीवर डोळा ठेवून पुढे आणलेल्या जुमल्यांवर लोकांनी भावूक होऊन विश्वास ठेवू नये. आता प्रत्येकाने जागृत राहण्याची आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे युरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT