Political Reservation  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: अनुसूचित जमातीच्‍या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चिघळणार?

Goa Politics: लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार हे आताच पुरेसे स्पष्ट होऊ लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार हे आताच पुरेसे स्पष्ट होऊ लागले आहे. हे आरक्षण मिळवण्यासाठी केवळ विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली आहे. मात्र, याचे श्रेय घेण्यावरूनच आता चढाओढ सुरू झाली आहे.

आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आदिवासींच्या अनेक संघटना मागणी करत होत्या. या सर्व संघटनांचा समावेश असलेला मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन नावाचा एक मंचही नंतर आकाराला आणण्यात आला होता. त्याने विधानसभेवर मोर्चा नेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

दरम्यानच्या काळात विधानसभेमध्ये विरोधी पक्षांकडून लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय विधानसभेत उपस्थितही करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आदिवासींचे शिष्टमंडळ दिल्लीला नेऊ असे आश्वासन दिले आणि ते पाळले. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात आदिवासी राजकीय आरक्षणासाठी मतदारसंघ फेररचना विधेयक मांडण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या निर्णयानंतर भाजपच्या पणजीतील कार्यालयात मुख्यमंत्र्यांना आदिवासी नेत्यांकडून पेढे भरवण्याचाही कार्यक्रम भाजपने घडवून आणला. आदिवासी नेत्यांना आपली फसवणूक झाली असे वाटत असतानाच आता दिल्लीतील या कामगिरीचे श्रेय घेण्यासाठी रेव्हॉल्‍युशनरी गोवन्स (आरजी) पक्ष पुढे आला आहे. त्याला आदिवासी नेत्यांनीच आता प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. यावरून या लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

गेल्‍या दोन वर्षांपासून आम्‍ही राजकीय आरक्षणासाठी लढत आहोत. वेंझी, विजय, युरी यांनी आमचा मुद्दा विधानसभेत मांडला. तेव्‍हा वीरेश यांनी मौन बाळगले. आरजीपी केवळ राजकीय फायदा उठवू पाहात आहे. आम्‍ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्‍कार टाकला. आरजीपी आम्‍हाला पाठिंबा देईल का?
- रुपेश वेळीप, एसटी नेते
अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्‍याचे सांगून भाजप एसटी मोर्चाचे नेते समाजाची दिशाभूल करत आहेत. मात्र, प्रत्‍यक्षात असे काहीच झालेले नाही. आरजीपीने मिशन राजकीय आरक्षणाला पाठिंबा दिल्‍याने सरकारला शिष्‍टमंडळ दिल्‍लीत घेऊन जावे लागले.
- रुबर्ट परेरा, आरजी द. गोवा उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT