Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती; हवामान खात्याने सांगितले 'या' दिवसापासून पावसाचा जोर वाढणार

सांगे व वाळपई येथे आज मुसळधार पाऊस बरसला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update : आगामी काळात ‘मान्सून सक्रीय’ होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने राज्यात शनिवारी व रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तविण्यात आला आहे. या काळात सोसाट्याचा वारा बहुतेक भागांत धडकण्याची शक्यता असल्याचाही अंदाज वर्तविला आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील काही धरणे कोरडी पडत आहेत. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गोव्यासह कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रात 23 जूनपासून पाऊस सुरु होईल. 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तविण्यात आला आहे.

दक्षिण गोव्यातील सांगे येथे व उत्तर गोव्यातील वाळपई येथे आज मुसळधार पाऊस पडला. आजचा पहिल्या पावसाने वाळपई अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तसेच सांगे येथील बेंदवाडा पुलावर पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी साचल्याचा प्रकार घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT