Rain Hit  Dainik Gomantak
गोवा

पर्येत जोराच्या पावसाने घर कोसळले; वृद्ध महिला बेघर

सतत पडणाऱ्या पावसामुळे जुनाट असलेले घर कोसळले

दैनिक गोमन्तक

पर्ये: घोलवाडा-पर्ये, सत्तरी येथील पार्वती महादेव गावकर (वय 78) या वृद्ध महिलेच्या घराची भिंत कोसळून महिला बेघर झाली आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी ही घटना घडली असून, येथील तिच्या घराची एक भिंत बाहेरच्या बाजूने पडली. कोसळलेल्या भिंतचा भाग कृष्णा गावकर यांच्या मागच्या घराच्या खोलीवर कोसळला. त्यामुळे गावकर यांचे नुकसान झाले आहे. (The house collapsed due to heavy rain at poriem; Older woman homeless )

घराची भिंत कोसळलेली ही महिला जुन्या घरात एकटीच राहत होती. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जुनाट असलेले घर पावसाच्या पाण्याने फुगल्याने असा प्रकार घडला आहे. वृद्ध महिलेच्या घराची भिंत बाहेरच्या बाजूला कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. कारण या घटनेवेळी वृद्ध महिला घरात एकटीच होती. कोसळलेले हे घर खूप जुनाट आणि याच्या भिंती मातीच्या होत्या. घरचे छप्पर जीर्ण झाल्याने त्यावर प्लास्टिक टाकलेले आहे.

Goa Rain Updates : 14 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट

गोव्यात तुफान पावसाने सगळीकडे दाणादाण करून सोडली आहे. अनेक ठिकाणी पडझड आणि लाखोंचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 14 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोव्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची (>24 तासांत 20 सेमी) शक्यता आहे. दरम्यान मच्छिमारांना 5 दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT