Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

शॉर्टसर्किटमुळे घराला लागली आग; लाखो रुपयांचे नुकसान

दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागलेल्या विद्याधर नागवेकर यांच्या निवासस्थानी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी येऊन पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

मुरगाव सडा येथील विद्याधर रामा नागवेकर यांच्या घराला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आगीत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण आणले.

मंगळवारी रात्री विजेच्या कडकडटासह गोव्यात पाऊस (Rainfall) पडला. यामुळे संपूर्ण मुरगाव तालुक्यात अनेक वेळा विजेची समस्या निर्माण झाली होती. मंगळवार (दि.5) मध्यरात्री दोन वाजता मुरगाव (Mormugao) सडा परिसरातील रहिवासी विद्याधर रामा नागवेकर यांच्या घरात वीजेमुळे शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण घराला आग लागली.

यामुळे नागवेकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घराला आग लागताच आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्निशमन दलाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण आणले.

दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागलेल्या विद्याधर नागवेकर यांच्या निवासस्थानी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी येऊन पाहणी केली. तसेच नागवेकर कुटुंबियांना सरकारमार्फत नुकसान झालेल्या घराला आर्थिक सहकार्य करणार असे आश्वासनही आमोणकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT