High Court Notice To GCZMA On Goa Shack Dainik Gomantak
गोवा

HC On Goa Shack: स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

High Court on Goa Shack: उच्च न्यायालयाने सोमवारी हणजूण येथील एका गोमंतकीयाने स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला करारावर चालवायला दिल्याबद्दल चांगलेच फटकारले.

गोमन्तक डिजिटल टीम

High Court Notice To GCZMA On Goa Shack: उच्च न्यायालयाने सोमवारी हणजूण येथील एका गोमंतकीयाने स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला करारावर चालवायला दिल्याबद्दल चांगलेच फटकारले. न्यायालयाने ‘जीसीझेडएमए’ला या शॅक मालकाला सर्व परवाने रद्द का करू नयेत, अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. मागील काही वर्षात तो स्वतः शॅकच्या व्यवसायात असूनही शॅक करारावर बिगर गोमंतकीयास किंवा इतरांना चालवायला देण्याची प्रथा रूढ झाल्याचे दिसून येते. असेच हणजुण येथील एक सोमवारी गोवा (Goa) खंडपीठातसमोर सुनावणीसाठी आले.

सुनावणीवेळी जेव्हा सदर शॅक स्वतःच्या मालकीचा असूनही त्याने दुसऱ्याला नियोजन करारावर चालवायला दिल्याचे उघडकीस आले, तेव्हा न्यायालयाने हा प्रकार चुकीचा असून असल्या गोष्टींना थारा देता येणार नाही, असे सुनावले. यावेळी, एजी देविदास पांगम यांनी स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला करारावर देता येत नसून, असे करणे अवैध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. शॅक मालकाची बाजू मांडणाऱ्या वकिलाने संबंधित खात्यांकडून आणि एजन्सीकडून शॅक उभारणीसाठी परवाने मिळवल्याचे सांगितले.

न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून, सर्व परवाने असूनही शॅक दुसऱ्या ला देणे, हे चुकीचे असल्याचे सांगत ‘जीसीझेडएमए’ला या शॅक मालकाला हे सर्व परवाने का रद्द करू नये, अशी नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT