Heat Wave in Goa Dainik Gomantak
गोवा

Heat Wave in Goa: उष्म्याची लाट निवळली; राज्यात तापमान कायम

पारा नेहमीपेक्षा 4 अंश सेल्सिअस जास्त

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Wave in Goa: समुद्रावरून भूखंडाकडे वाहणारे मतलई वारे (सी ब्रिजेस) वेळेत सुरू झाल्याने आज शक्यता असलेली उष्म्याची लाट निर्माण झाली नाही.

मात्र, तापमान नेहमीपेक्षा चार अंश सेल्सिअस जास्त राहिले. उद्याही अशीच शक्यता असेल, असे अनुमान हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात समुद्र किनारी भागातील तापमान हे समुद्रावरून वाहणाऱ्या मतलई (खारे) वाऱ्यावर अवलंबून असते. हे वारे सर्वसाधारणपणे सकाळी 11 ते 12.30 पर्यंत स्थिर होते.

मात्र, या वाऱ्यांना उशीर झाल्यास किनारपट्टी भागातील आणि लगतच्या प्रदेशातील तापमान झपाट्याने वाढते. बुधवारी (८ मार्च) रोजी हे वारे उशिरा वाहू लागल्याने तापमानात झपाट्याने वाढ झाली.

तापमान 38.4 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी नोंदले गेले. त्याचा परिणाम उष्म्याच्या लाटेत झाला होता. मात्र, आज समुद्रावरून वाहणारे मतलई वारे वेळेत सुरू झाल्याने राज्यात तापमान वाढलेले असले तरी ते 36 अंशांपर्यंत पोहोचले.

शाळा 12 ला सुटल्या

उष्म्याच्या लाटेचा सर्वांत मोठा फटका मुले आणि वृद्धांना बसतो. वेधशाळेच्या अंदाजानुसार शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत सोडावे, असा अध्यादेश काढला होता. त्यानुसार शाळा आज दुपारी 12 वाजता सोडण्यात आल्या.

राज्यात 10 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली होती. मात्र, आजपासून राज्यात उष्णतेची लाट नसली तरी कमाल तापमान हे अधिकच असणार आहे. त्यासोबतच 15 मार्चनंतर राज्यात पावसाची शक्यता आहे.

- एम. राहुल, वैज्ञानिक, गोवा वेधशाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT