Corona Virus |Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Case: कोरोना बाधित वाढल्याने आरोग्य खाते सतर्क

नवे 22 बाधित; एकूण संख्या 85 वर

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत असून कालच्या पेक्षा बाधितांच्या संख्येत आज दुप्पट वाढ झाली. त्यातच ‘एच3 -एन2 फ्ल्यू’ची भीतीही पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

आरोग्य खात्याचे साथ रोग प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी म्हणाले, राज्यात कोरोनाची संख्या कालच्या पेक्षा आज दुप्पट झाली आहे. यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. जगभर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

जानेवारी ते मार्च आणि ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत कोरोना वाढल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. राज्यातही ठिकठिकाणची रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. हे काळजी वाढवणारे आहे. यासाठी योग्य ती दक्षता घ्यावीच लागेल. कारण अलीकडच्या काळात लोकांनी बचावात्मक उपाय सोडून दिले आहेत.

अशी घ्या दक्षता-

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा.

  • जे लोक आजारी आहेत आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

  • फ्ल्यूबाबत दोन वर्षांखालील मुलांची काळजी अधिक घ्या.

जीएमसी’त गर्दी

फ्लूची साथ सुरु असल्यामुळे राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि घशातील खवखव या त्रासामुळे गर्दी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गोवा वैद्यकिय महाविद्यालयातही रुग्णांची संख्या वाढली आहे.

बरेच लोक डॉक्टरांना फ्ल्यूबाबत विचारणा करीत आहेत. फ्ल्यूच्या भीतीमुळे तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नव्या व्हेरीयंटचा गोव्यात अजून रुग्ण आढळून आला नसला तरी लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

‘फ्ल्यू’च्या तपासणीसाठी नमुने पुण्यात

‘फ्ल्यू’चे प्रमाण वाढत असल्याने राज्यातील काही रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. यासंबंधीचे सर्व निर्णय ‘आयसीएमआर’ घेते. त्यामुळे त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्हाला प्रतीक्षा असून या प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या नमुनेही प्रलंबित आहेत, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

SCROLL FOR NEXT