Sports Ground Dainik Gomantak
गोवा

Goa: बांदोड्यातील मैदान ठरणार राज्यात ‘युनिक’

मंत्री सुदिन ढवळीकर : कामाची निविदा कंत्राटदारास प्रदान; देशी खेळालाही देणार प्राधान्य

दैनिक गोमन्तक

बांदोड्यातील भाऊसाहेब बांदोडकर मैदान हे राज्यातील एक ‘युनिक’ मैदान ठरेल. याच्या कामाची निविदा संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली आहे. कोरोना, पाऊस व इतर गोष्टींमुळे रखडलेल्या या कामाला लवकरच सुरवात होणार आहे, असे मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले.

यावेळी माजी सरपंच राजेश कवळेकर तसेच बांदोडा यूथचे सदस्य उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले की, मैदानाचा वापर केवळ बांदोड्यापुरता मर्यादित नसून सबंध फोंड्यासाठी होत आहे. रोज किमान हजारभर लोक या मैदानाचा लाभ घेतात. विशेषतः चालण्यासाठी ज्येष्ठ, युवा वर्गही या येतात.

मागच्या काळात मैदानाच्या नूतनीकरणासाठी जाहीर झालेली निविदा एक कोटी रुपयांची होती. ही निविदाही देण्यात आली असून नंतरच्या काळात देशी खेळांच्या उपयोगासाठी या मैदानाचा वापर व्हावा, असा प्रस्ताव काही खेळाडूंकडून आल्याने आपण पुन्हा एकदा या मैदानाच्या नूतनीकरणात बदल केला आहे. त्यामुळे नंतरची निविदा ही दीड कोटी रुपयांची असेल.

फुटबॉलसह कबड्डी, क्रिकेटकडेही लक्ष

बांदोडकर मैदानावर फुटबॉल खेळासह देशी खेळांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यात कबड्डी खेळाला प्रथम स्थान देण्यात आले असून त्यासाठी सुरेख मैदान तयार करण्याबरोबरच क्रिकेट सरावासाठी एक चांगली खेळपट्टी करण्यात येत आहे. याशिवाय लोकांना बसण्यासाठी चांगली सुविधा, सभागृहाची अत्याधुनिकता आणि रंगरंगोटी याबरोबरच चालण्यासाठी उपयुक्त असे वॉकिंग ट्रॅकही करण्यात येणार आहेत, असे ढवळीकर म्हणाले.

केरळ येथील एका आयटीसी हॉटेलमधील सायकलचा सुरेख ट्रॅक आपल्या निदर्शनास आला, त्याच धर्तीवर या ठिकाणीही काही करता येईल काय, या विचाराने पुढील काम होणार आहे. बांदोडकर मैदानामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचीही चांगली सोय झाली आहे.- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT