Goa Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Goa Gram Sabha: राज्यातील ग्रामसभा तापल्या! महामार्ग रुंदीकरणाविरोधात भोम पंचायतीचा ठराव

अनेक ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक

Akshay Nirmale

Goa Gram Sabha: राज्यात सध्या महामार्ग रुंदीकरणाचा विषय गाजत आहे. रविवारी भोम सरपंच आणि आंदोलकांच्या गटात वाद झाला. अखेर भोम पंचायतीने महामार्ग रुंदीकरणाच्या विरोधात ठराव घेतला.

केंद्र सरकार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच यासंबंधी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याची घोषणा सरपंच दामू नाईक यांनी ग्रामसभेत केली.

महामार्ग विस्तारीकरणासाठी पाडण्यात येत असलेल्या घरांबाबत स्पष्टता न दिल्याने भोम ग्रामस्थांनी सरपंच दामू नाईक यांना घेरले. सरकार ग्रामस्थांशी खोटे बोलत असून पंचायतीला याची जाणीव आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

ध्वनिप्रदूषण आवरा, मोरजी ग्रामसभेत मागणी!

वीज, पाणी, रस्ते, ध्वनी प्रदूषणावर मोरजी ग्रामसभेत गरमागरम चर्चा झाली. आमदार जीत आरोलकरांची ग्रामसभेला उपस्थिती होती. खणलेले रस्ते त्वरित बुजवावेत. मधलावाडा-मोरजी येथे स्व. आमदार काशिनाथ शेटगावकर यांचा पुतळा उभारण्याबाबत ठराव संमत करण्यात आला.

पंचायत सचिवाची बदली करा, वेर्ला-काणका येथे मागणी

वेर्ला-काणका पंचायतीच्या सचिव निकिता परब यांची पंचायतीतील नेहमीची गैरहजेरी आणि अनियमित कारभारावर लोक आणि पंचायत मंडळाने संताप व्यक्त केला. निकिता परब यांची तत्काळ बदली करण्याची ग्रामसभेत मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT