जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने कांदोळीत पर्यटक सहायता तसेच माहिती घराचे उद्घाटन करतांना Dr.CM Pramod Sawant, सोबत मंत्री मायकल लोबो तसेच पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना व इतर मान्यवर Dainik Gomantak
गोवा

अतिथी देवो भव् तत्वानुसार  सरकार पर्यटकांचे हीतरक्षण करणार 'मुख्यमंत्री डॉ. सावंत'

गोव्याला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची सुरक्षा अतिथी देवो भव् तत्वानुसार शिरसावंद्य मानून त्यांच्या हीतरक्षणाची जबाबदारी उचलतांना राज्यात आजपासून विशेष पर्यटक पोलिस दलाची स्थापना करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: गोव्याला (Goa) भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची (Tourists) सुरक्षा अतिथी देवो भव् तत्वानुसार (Atithi Devo Bhav)  शिरसावंद्य मानून त्यांच्या हीतरक्षणाची जबाबदारी उचलतांना  राज्यात आजपासून विशेष पर्यटक पोलिस (Police) दलाची स्थापना करण्यात येत आहे, पर्यटकांशी बेशिस्त वर्तन करणार्‍या कुणाचीही यापुढे गय केली जाणार नसल्याचे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कांदोळीत केले.

जागतिक पर्यटन दिनाच्या पाश्वभुमीवर कांदोळी येथील पर्यटक पोलिस सहायता तसेच माहिती केद्राचे  उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुटचे आमदार तथा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना, पर्यटन खात्याचे सचिव जे. अशोक कुमार तसेच कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स आणी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन इडंस्ट्री ही राज्यातील उत्पन्नाचा प्रमुख कणा असल्याने दर्जेदार पर्यटक प्राप्त करण्यासाठी सरकार तसेच पर्यटनाशी जुडलेल्या स्थानिक व्यवसायिकांकडून संयुक्तरित्या प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी  केले. दरम्यान, पर्यटनाच्या द्रुष्टीने राज्य सुरक्षित असल्याचा संदेश जगभरात पोहोचविण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबर पर्यत शंभर टक्के लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी आश्वासन दिले. दरम्यान, राज्यातील पर्यटकांना स्थानिक वाहतूक पोलिस यंत्रणाकडून त्रास होणार नाही यांकडे ग्रुहखात्याने लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी केली.

अधिकाधिक  विदेशी पर्यटकांना गोव्यात दाखल करून घेण्यासाठी चार्टड  सेवा लवकरात लवकर सुरु होणे आवश्यक आहे यासाठी  केंद्राकडून त्वरीत पाऊले उचलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक पाठपुरावा करण्याची  मागणी मंत्री लोबो यांनी केली. पोलिस महानिरीक्षक मुकेश कुमार मीना यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. पर्यटन खात्याचे सचीव जे.अशोक कुमार यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT