Minister Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

स्वयंपूर्ण गोवा योजनेचा हेतू प्रत्येकाला स्वावलंबी करणे: मंत्री मायकल लोबो

आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Rural Development Minister Michael Lobo) यांनी शिवोलीत सांगितले.

दैनिक गोमन्तक

स्वयंपूर्ण गोवा (Goa) योजनेचा हेतु हा प्रत्येक गोमंतकीय माणसाला स्वावलंबी करणे असा असून त्याच  हेतुने गोव्याच्या कानाकोपऱ्यात कार्य करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Rural Development Minister Michael Lobo) यांनी शिवोलीत सांगितले. राय -शिवोली येथील कष्टकरी जग्गनाथ वेर्णेकर या मासळी व्यवसाय करणाऱ्या  इसमास मोफत नवीकोरी  होडी प्रदान केल्यानंतर मंत्री लोबो बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पर्राच्या सरपंच दिलायला लोबो, मार्ना शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर, उप-सरपंच विलीयम फर्नांडिस (William Fernandes), पंच सदस्य सिल्वेस्टर फर्नांडिस, फ्रेडी फर्नांडिस, मोनाली आगरवाडेकर, सामाजिक कार्यकर्ते बाबुसो वायंगणकर, अमीत नायक तसेच मोठ्या संख्येने राय -शिवोलीतील  ग्रांमस्थ उपस्थित होते.

यावेळी स्थानिक  पत्रकार तसेच ग्रांमस्थांशी  बोलतांना मंत्री लोबो यांनी  गोव्याचा प्रत्येक तरुण ज्या दिवशी स्वताच्या पायावर उभा राहिल त्या दिवशी गोवा खर्या अर्थाने  स्वयंपूर्ण झाला असे म्हणता येईल असे सांगितले. दरम्यान,  जग्गनाथ वेर्णेकर  हा मासळी व्यवसाय करणारा कष्टकरी माणुस आहे दुर्दैवाने हल्लीच राज्याला दणका दिलेल्या  तौक्ते वादळात त्याच्या स्वताच्या होडीची नासधूस झाल्याने त्याच्यावर बाका प्रसंग ओढवला होता. दरम्यान, लोबो दांम्पत्याच्या पुढाकाराने त्यांना नवीन होडी उपलब्ध करून देण्यात आल्याने वेर्णेकर यांना उपजिवीकेचे साधन उपलब्ध झाले असल्याचे मार्ना -शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर यांनी यावेळी सांगितले.

पर्राच्या सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या दिलायला लोबो यांनी यावेळी आपण सर्वचजण एकाच मातीची लेकरे असल्याने एकदुसर्यास मदत करणे आपणां सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे सांगितले त्यांचप्रमाणे भविष्यात शिवोलीतील कुणाही गरजवंतास मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दिले. यावेळी, जग्गनाथ वेर्णेकर यांनी लोबो दांम्पत्याने संकटसमयी आपल्याला कमाईचे साधन प्राप्त करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले......

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT