Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: मोठी बातमी! गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ, सरकारने वाढवला व्हॅट

Goa Petrol Diesel Price: शनिवारपासून (दि.22 जून) पेट्रोल - डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price

गोव्यात पेट्रोल - डिझेलच्या दरात वाढ होणार असून, राज्य सरकारद्वारे इंधनावर लावण्यात येणारा मूल्यवर्धित करात (Value Added Tax) वाढ केली आहे. यामुळे सामान्य गोमंतकीयांनी उद्यापासून (शनिवार, दि.22 जून) पेट्रोल - डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Goa Government Gazette

शनिवारपासून (22 जून) गोमंतकीयांना पेट्रोलसाठी एक रुपया तर डिझेलसाठी 36 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत.

आजच्या (शुक्रवार, दि,२१ जून) ताज्या दरानुसार, उत्तर गोव्यात (पणजी) पेट्रोल 95.34 रुपये प्रतिलिटर आणि दक्षिण गोव्यात 95.41 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे.

तर डिझेल राजधानी पणजीसह उत्तर गोव्यात 87.90 आणि दक्षिण गोव्यात 87.97 रुपये दराने विक्री होत आहे.

जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर इंधनाचे दर ठरवले जातात. पण, राज्याद्वारे लागू होणाऱ्या विविध करांमुळे इंधनाच्या दरात बदल होत असतो.

पर्यटन राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्या शेजारी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या तुलनेत जवळपास दहा रुपये कमी दराने पेट्रोल तर सात ते आठ रुपये कमी दराने डिझेल मिळत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT