Goa Casino Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: ‘कॅसिनोवाहू जहाजांना हंगामी परवाने कसे?’

Goa Casino: मांडवी नदीतील सहा कॅसिनोवाहू जहाजांना नांगर घालण्यास गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने हंगामी ‘ना हरकत दाखला’ कसा दिला, असा प्रश्न माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Casino: मांडवी नदीतील सहा कॅसिनोवाहू जहाजांना नांगर घालण्यास गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने हंगामी ‘ना हरकत दाखला’ कसा दिला, असा प्रश्न माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी उपस्थित केला आहे.

असा दाखला देणे हा न्यायालयाचा अवमान असून तसा खटला आपण दाखल करणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे.

शेटये यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. कायमस्वरूपी एका जागी जहाज उभे करणे, हा सागरी अधिनियमांचा भंग होतो, असा त्यांचा दावा होता. तो लवादाने ग्राह्य मानला. त्याला कॅसिनो चालक असलेल्या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हा विषय न्यायप्रविष्ट असताना तसेच लवादाने प्रतिकूल मत व्यक्त केले असतानाही प्राधिकरण ‘ना हरकत’ दाखले कसे देऊ शकते? असे शेटये यांचे म्हणणे आहे.

आता प्राधिकरणाने स्थायी ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी कॅसिनोवाहू जहाजांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि हा विषय चर्चेत आला आहे. यावेळी प्राधिकरणाने हंगामी दाखले जारी केल्याची बाबही उघड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT