Crime News  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : चार अल्पवयीन मुले केवळ एक दिवस पाहुणचार घेऊन पसार

अपना घरातून फोंड्यातील आश्रमात केली होती रवानगी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Ponda News : अपना घरातून फोंड्यातील एका आश्रमात पाठवलेली चार अल्पवयीन मुले केवळ एक दिवसाचा पाहुणचार घेऊन दुसऱ्याच दिवशी पळून गेली. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असली तरी त्यांचा पोलिसांना अद्याप मागमूस लागलेला नाही.

मेरशी येथील अपनाघरातून या चारही अल्पवयीनांना 31 मार्चला फोंड्यातील एका आश्रमात पाठवले होते. या चौघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्यांना १ मार्चला मडगावात ताब्यात घेतले होते. चोरीच्या प्रकरणात गुंतलेले हे चारही अल्पवयीन तेरा ते सोळा वयोगटातील आहेत.

मडगावात ताब्यात घेतल्यानंतर त्यांची रवानगी अपना घरातील बाल सुधारगृहात केली होती. तेथे महिनाभर ठेवल्यावर त्यांना फोंड्यातील आश्रमात 31 मार्चला पाठवले होते. या चौघांनी एक दिवसाचा पाहुणचार घेतला आणि दिवस उजाडायच्या आत 1 एप्रिल रोजी पहाटेच ते पळून गेले.

सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर आश्रम प्रमुखांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंदवली. हे चारहीजण फोंड्यात आल्यावर त्यांनी कर्नाटकात पलायन केले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तिघे चंदीगढचे, तर एक केरळचा!

पळून गेलेल्या चौघांपैकी तिघेजण चंदीगढचे असून एकजण केरळ राज्यातील आहे. हे चौघेही मित्र असून त्यांनी फोंड्यातील आश्रमात आल्यानंतर पलायनाचा बेत रचला असावा.

एक एप्रिल रोजी पहाटेच त्यांनी फोंडा बसस्थानक गाठले असावे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात ठेवून त्यांना सुधारण्याऐवजी त्यांची रवानगी थेट आश्रमात कशी केली जाते, असा सवाल करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT