Ponda News
Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: माशेल पंचकोशीत मासळी मार्केटचा तिढा कायम

गोमन्तक डिजिटल टीम

माशेल मासळी मार्केटचा तिढा कायम असून फक्त दोन दिवस नव्या मार्केटात मासळी विक्रेते बसले होते, त्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या मार्केटात मासळी विक्री सुरू केली.

सोमवारी फोंडा पोलिसांनी नव्या जागेत मासळी विक्री करण्यास सांगितले, पण मासळी विक्रेत्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिसांनी वकिलांनी सांगितले. त्यामुळे सोमवारीही मासळी मार्केटचे स्थलांतर रखडले.

सोमवारी (ता.२०) सकाळी फोंडा पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी विनोद साळुंकी फौज फाट्यासह माशेल मासळी मार्केटात हजर झाले व तेथून त्यांनी मासळी विक्रेत्यांना नवीन कदंबा स्थानकाच्या मार्केटात जाण्यासाठी विनंती केली.

परंतु मासळी विक्रेत्यांनी त्यांना दाद दिली नाही. लगेच त्यांनी ॲड. विशाल फडते यांना बोलावून घेऊन मासळीच्या मार्केटचा विषय न्यायालयात असल्याचे सांगितले. त्याबाबत कागदपत्रेही सादर केली. त्यामुळे पोलिस माघारी फिरले.

जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही पंचायतीने आमच्या मागण्या पूर्ण करणे आवश्‍यक आहे, असेही मासळी विक्रेत्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे पंचायतीतर्फे मासळी मार्केटच्या स्थलांतराबाबतच दुसरा प्रयोगही यशस्वी झाला नाही.

आत्ता मासळी मार्केट स्थलांतरासाठी पुढे काय? हा प्रश्‍नच आहे. मासळी मार्केटसाठी जागा निश्‍चित आहे. सर्व व्यवस्था आहे, असे पंचायतीच मत आहे. नेमके घोडे कुठे अडते, त्याबाबत सामंजस्याने तोडगा काढणे गरजे आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे.

सर्वांच्या सोयीसाठी निर्णय

मासळी मार्केटसाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. ग्रामस्थ व विक्रेत्यांना सोयीचे असे हे मार्केट आहे. त्याठिकाणी मासळी मार्केटचे स्थलांतर झाले तर सर्वांनाच सोयीचे होईल. सर्व सोयी उपलब्ध करूनही नवे मार्केट मोकळे ठेवणे चुकीचे आहे.

त्याचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी मासळी विक्रेत्यांनी नव्या मार्केटात जाणे गरजेचे आहे. विस्तारणाऱ्या माशेल पंचक्रोशीत रहदारी वाढली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो.

तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी होणारे बदल स्वीकारले पाहिजे, त्यासाठीच मासळी मार्केट स्थलांतराचा निर्णय घेण्यात आहे, असे सरपंच जयेश नाईक यांनी सांगितले.

नवे मार्केट पांढरा हत्ती?

माशेल पंचक्रोशीत पूर्वीच्या मासळी मार्केटबरोबरच अन्यत्र दोन-तीन ठिकाणी मासेविक्री सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला सकाळ, संध्याकाळी मासेविक्री केली जाते. त्यामुळे मूळ मार्केटवर परिणाम होतो, असे मूळ मासळी मार्केटातील विक्रेत्यांचे मत आहे.

माशेल कदंब बसस्थानकाच्या वरच्या बाजूला बगल मार्गाजवळ मोठ्या प्रमाणात मासेविक्री सुरू आहे. अलीकडच्या काळात मासेविक्रीचे मोठे केंद्र झाले आहे. शिवाय खांडोळा-गवंडाळी बगलमार्गावरही अनेक ठिकाण मासेविक्री केली जाते.

त्यामुळे माशेलात सुसज्ज मासळी मार्केट असूनही ते विनावापर राहिले तर ते ‘पांढरा हत्ती’ पोसल्यासारखे होण्याची शक्यता आहे, यावर पंचायत व मासळी विक्रेत्यांनी त्वरित तोडगा काढणे आवश्‍यक आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT