Goa College Admission: Dainik Gomantak
गोवा

Goa College Admission: ऑनलाईन प्रवेशाची पहिली फेरी उद्यापासून सुरू

राज्यातील महाविद्यालये : उच्च शिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa College Admission राज्यातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवार, 29 रोजीपासून प्रारंभ होत आहे.

उच्च शिक्षण संचालनालय (DHE) गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉम, बीएससी, यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी तसेच बी.ए., एल.एल.बी., बी.ए.बी.एड, संगीत, थिएटर, होम सायन्स, बीएससी अॕग्रीकल्चर, बीसीए, बीबीए, पीजीडीटी, पीजीडीसीए, बीपीएड या विभागांसाठीची ही प्रथम फेरी आहे. तरी विविध शाखांच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयातर्फे डाॕ. महादेव गावस यांनी केले आहे.

इथे साधू शकता संपर्क

सोमवार, 29 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. इच्छुक अर्जदारांनी सकाळी ११ वाजेपासून https://dhe.goa.gov.in/resource/getPage/ugadmissions वर उपलब्ध असलेल्या कॉमन पोर्टलद्वारे अर्ज करावेत.

विद्यार्थी त्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तसेच कोणत्याही साहाय्यासाठी प्रवेशाच्या तारखांना महाविद्यालये किंवा DHE गोवा कार्यालयातदेखील भेट देऊ शकतात.c- डाॕ. महादेव गवस, उच्च शिक्षण संचालनालय गोवा

  • अशा आहेत विद्यार्थ्यांना सूचना

1. पोर्टल अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करेल.

2. संबंधित महाविद्यालयाच्या वेबपोर्टलवर मोफत ई-प्रॉस्पेक्टस उपलब्ध असेल.

3. सेल्फ फायनान्स प्रोग्राम्ससाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले अर्जदार देखील त्याच पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

4. या पोर्टलद्वारे, अर्जदार त्यांच्या प्राधान्यांच्या आधारावर गोव्यातील जास्तीत जास्त तीन महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT