Anjuna Tourist Attack Dainik Gomantak
गोवा

Anjuna Tourist Attack: हणजूण हल्लाप्रकरणातील पाचवा संशयित गजाआड

संशयित हा म्हापसा-पणजी हमरस्त्यावरून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Tourist Attack हणजूण येथील खासगी हॅटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांवर स्थानिक तरुणांकडून झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याच्या कारणावरून म्हापसा पोलिसांनी बुधवारी खोर्ली-म्हापसा येथील सलीम कासीम खान (41) याच्या मुसक्या आवळल्या.

संशयित सलीम खान म्हापसा-पणजी हमरस्त्यावरून जात असताना म्हापसा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, हणजूण येथील खासगी हॅटेलात उतरलेल्या एकूण चार जणांच्या गटातील पर्यटकांवर गेल्या शुक्रवारी स्थानिक तरुणांच्या गटाकडून हा हल्ला करण्यात आला होता.

यासंबंधात पोलिस तक्रार करूनही पोलिसांकडून संशयितांना गजाआड करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत तक्रारदार पर्यटकांनी सोशल मीडियाचा उपयोग करीत ही घटना राज्यातील पोलिस महानिरीक्षकांपर्यंत पोहोचविली होती.

4 संशयित पोलिस कोठडीत

आतापर्यंत या मारहाण प्रकरणात सहभागी रॉयस्टन रेजिनाल्डो डायस, नायरॉन रेजिनाल्डो डायस, काशिनाथ ईश्वर आगरवाडेकर व जोजफ आलेक्स लोबो यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

दरम्यान, म्हापसा पोलिसांकडून बुधवारी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी सलीम खान याच्या अटकेनंतर या हल्ला प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या पाचवर गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT