South Goa Comunidade Election Process
सासष्टी: दक्षिण गोव्यातील कोमुनिदादची निवडणूक प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरु होत आहे. ही प्रक्रिया दोन महिने चालणार आहे. मात्र ही निवडणूक प्रक्रिया पुढे जाईल की नाही याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
त्याचे एक कारण म्हणजे दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक मंगलदास गावकर सोमवारपासून दोन आठवड्यासाठी रजेवर असल्याने कुंकळ्ळीचे मुख्याधिकारी जॉन फर्नांडिस यांच्याकडे तात्पुरता ताबा सोपविण्यात आला आहे. फर्नांडिस यांच्याकडे कुडचडे पालिकेचाही ताबा असल्याने त्यांच्या कामाचा बोजा वाढणार आहे. अशा स्थितीत कोमुनिदाद निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पूर्णवेळ प्रशासकाची आवश्यकता असल्याचे मडगाव कोमुनिदादचे ॲटर्नी सेलेस्टीन नोरोन्हा यांचे म्हणणे आहे. सध्या प्रशासकपदी कुणीही व्यक्ती दिसत नाही, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया नेमकी कोणता अधिकारी हाताळणार आहे हे आम्हाला कळलेले नसल्याचे मडगाव कोमुनिदादचे अध्यक्ष सावियो कुर्रैया सांगतात.
हंगामी प्रशासक जॉन फर्नांडिस यांनी मडगाव, वेर्णा व कोठंबी या कोमुनिदादच्या निवडणुका जानेवारी २०२५ मध्ये घ्याव्या, असे शुद्धीपत्रक जारी केल्याचे कळते.
दरम्यान, दक्षिण गोवा कोमुनिदाद फोरमच्या म्हणण्यानुसार दक्षिण गोव्याचे पूर्वीचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी कोमुनिदादच्या समस्या जाणून घेण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. दोन महिने उलटले तरी समस्यांचे निरसन झाले नसल्याचे फरोमचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.