The District Collector of South Goa has ordered to start the process of immediate demolition of illegal constructions near the coast Dainik Gomantak
गोवा

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Constructions: गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणासह, न्यायालय, हरित न्यायाधिकारिणीने किनारपट्टीतील बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्याचे पाहुन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना ही बांधकामे त्वरित पाडण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश दिला आहे.

न्यायालयाने (Court) या विलंबाची गंभीर दखल घेतल्याने जिल्हाधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे. सासष्टी व दक्षिण गोवा किनारपट्टीवर अनेक बेकायदेशीर बांधकामे आहेत हे न्यायालयाच्या अवमान याचिकेद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश सासष्टी १, सासष्टी २, मुरगाव, काणकोण, फोंडा व केपे येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अवमान याचिका दाखल केल्यानंतरही बेकायदेशीर बांधकामांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. अशा बाबी गंभीरपणे घ्यायला हव्यात, असेही न्यायालयाचे म्हणणे आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब का होत आहे, याची कारणे सुद्धा देण्यात येत नाहीत. यासंदर्भात न्यायालयाने पंचायती, नगरपालिका व इतरांवर ही कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT