Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Agriculture Minister Ravi Naik: जनतेच्या सहकार्यामुळेच राज्याचा विकास

Agriculture Minister Ravi Naik: कृषीमंत्री रवी नाईक : फोंड्यात मुक्तिदिन उत्साहात; नागरिकांची मोठी उपस्थिती

दैनिक गोमन्तक

Agriculture Minister Ravi Naik: पोर्तुगिजांच्या तावडीतून गोवा मुक्त झाल्यानंतर आज जी प्रगती झाली आहे, विकास प्रकल्प उभे राहिले आहेत, ते गोमंतकीयांच्या एकजुटीचे आणि सहकार्याचे प्रतीक आहे. अशाच सहकार्याची निरंतर गरज असल्याचे मत फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले.

फोंड्यात मंगळवारी गोवा मुक्तिदिन कार्यक्रम क्रांती मैदानावर उत्साहात साजरा झाला. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक यांनी ध्वजारोहण केले. त्यापूर्वी त्यांनी तसेच इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर इतर सर्व नगरसेवक, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, लष्कराचे अधिकारी तसेच नागरिक, सरकारी अधिकारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधानांचे धोरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर देश बलवान होण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. शैक्षणिक सुविधांबरोबरच आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी देशभर प्रयत्न करण्यात येत असून गावागावांत शाळा, विद्यालये सुरू करून कमकुवत घटकांना शिक्षित करण्यासाठी आतापर्यंत मोठे निर्णय घेण्यात आल्याचे रवी नाईक म्हणाले.

मुलांचे सुरेख सादरीकरण!

गोवा मुक्तिदिनानिमित्त फोंडा तालुक्यातील विविध विद्यालयांतील मुलांनी सुरेख स्वातंत्र्यगीते सादर केली. या समरगीतांनाही उपस्थितांकडून तेवढाच प्रतिसाद लाभला. रवी नाईक यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे सक्षम नागरिक असून त्यांच्याच खांद्यावर देशाचे भवितव्य असल्याचे नमूद केले.

पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीला उलथवून टाकण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी अपार कष्ट सोसले, प्रसंगी बलिदान केले. या समर्पणाच्या भावनेतून आणि लष्कराच्या प्रयत्नांमुळे अखेर गोवा मुक्त झाला. आज गोव्याची जी प्रगती झाली आहे, आणि होत आहे, त्याचा फायदा नागरिकांनाच होत आहे.
- रवी नाईक, कृषिमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT