Benaulim  dainik gomantak
गोवा

स्टील्टवरच रस्ता बांधा! बाणावलीच्या नागरिकांची मागणी

बाजू मांडण्यासाठी वकील नेमण्याचा बाणावली पंचायतीचा ठराव

दैनिक गोमन्तक

मडगाव : पश्चिम बगल रस्ता प्रकल्पाचा तळेबांध ते सुरावलीपर्यंतचा भाग स्टील्टवरच बांधावा, अशी बाणावलीच्या नागरिकांनी मागणी केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात गावकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करण्याचा ठराव आज बाणावली पंचायतीने घेतला. (The decision of the Benaulim Panchayat to appoint a lawyer to present the case)

हा रस्ता मातीचा भराव घालून बांधला जात असल्याने या भागात पूर येईल अशी भीती व्यक्त करून लोकांनी हे काम बंद पाडले होते. त्याविरोधात न्यायालयात (Court) एकाने रिट याचिका दाखल केली असता पोलिस (Police) संरक्षणात हे काम सुरू करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर हे काम परत सुरू झाले होते.

हे काम परत सुरू करण्यास स्थानिकांनी पुन्हा विरोध केला होता. त्यामुळे स्थानिक आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी हस्तक्षेप करून हे काम बंद करण्यासाठी पुन्हा न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी स्थानिक पंचायतीने ठराव घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती.

यासाठी आज सकाळी ९.३० वाजता बैठक बोलाविली होती. पंचायत काय ठराव घेते हे जाणून घेण्यासाठी लोकांनी पंचायत कार्यालयात गर्दी केली होती. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत ही बैठक सुरू न झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. शेवटी १२ वाजता ही बैठक सुरू झाली.

या बैठकीत उच्च न्यायालयात (HC) जाण्यासाठी आमदार व्हिएगस यांनी सूचित केलेल्या वकिलांची (Lawyers) नियुक्ती करण्याचा ठराव पंचायतीने घेतल्याची माहिती उपसरपंच निलेश प्रभुदेसाई यांनी दिली. तर हा ठराव कालच घेण्यात आला होता आजच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असे स्थानिक पंच सदस्य फेलिसिया नोरोन्हा यांनी सांगितले.

पंच सदस्य रॉयला फेर्नांडिस यांनी हा निर्णय घेण्यास पंचायत समितीने अक्षम्य असा उशीर केला असा आरोप केला तर सांतान फेर्नांडिस यांनी याला माजी आमदार (MLA) चर्चिल आलेमाव हे जबाबदार असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT