Kelbai Devi Mandir
Kelbai Devi Mandir Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: मयेत कळसोत्सवावर यंदाही वादाचे सावट

दैनिक गोमन्तक

Goa Culture:

समस्त भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवालाgoa police आजपासून (ता.14 ) प्रारंभ झाला असला, तरी श्री केळबायदेवीच्या मंदिरात कळस रोखल्याने या उत्सवावर वादाचे सावट असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

शेकडो भक्तगणांच्या साक्षीने आणि पोलिस बंदोबस्तात आज सायंकाळी गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरातून देवीचा कळस बाहेर काढला खरा; मात्र केळबायवाडा येथील नाईक गटातील लोकांनी श्री मंदिराच्या प्रवेशद्वारावरच कळस रोखला.

कळसाला मंदिरात प्रवेश दिला नसल्याने गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला कळसोत्सव यंदाही निर्विघ्नपणे साजरा होणार की नाही, त्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी तर कळसोत्सव साजरा होत असतानाच वाद निर्माण झाल्याने हा उत्सव अर्ध्यावरच बंद ठेवण्याची वेळ आली होती. उद्यापासून आठ दिवस भक्तांच्या भेटीसाठी कळसाचे घरोघरी आगमन होणार आहे.

वादाची पार्श्वभूमी

  • मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील कळसोत्सव गेल्या २०१९ वर्षांपासून वादात अडकला आहे.

  • कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून २०१९ साली कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवालय प्रशासकांनी निलंबित केले होते.

  • २०२० सालीही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शेवटच्या क्षणी कळसोत्सव निलंबित केला होता.

  • मात्र नंतर उच्च न्यायालयाने परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्यानंतर त्यावर्षी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात एकाच दिवशी कळसोत्सव साजरा केला.

  • २०२१ आणि २०२२ साली मात्र किरकोळ अपवाद वगळता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता.

  • गेल्या वर्षीही वाद निर्माण झाल्यानंतर अर्ध्यावरच कळसोत्सव रद्द करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT