Goa Illegal Construction  Dainik Gomantak
गोवा

Illegal construction at Vagator: वागातोर येथील अवैध बांधकामाला 5 लाखांचा दंड; अनेकांचे धाबे दणाणले

वागातोर किनाऱ्यावर बेकायदा बांधकाम; न्यायालयाने एकाला दिला 5 लाखचा दणका

दैनिक गोमंतक

राज्य सरकारने पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी कडक नियमावलीचा अंवलंब केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा सुरु केली आहे. अशीच कारवाई वागातोर समुद्र किनाऱ्यावर प्रशासनाने अवैध बांधकाम करणाऱ्यांवर केली होती. ही कारवाई मोडणाऱ्या एकाला न्यायालयाने दणका दिला आहे.

(The court has imposed a fine of 5 lakh on the illegal construction on Vagator beach)

मिळालेल्या माहितीनुसार वागातोर किनाऱ्यावर गोवा पर्यटन विकास मंहामंडळाच्या जमिनीवरील अवैध बांधकाम गेल्या काही दिवसांपुर्वी जमिनदोस्त केले होते. असे असताना एका व्यक्तीने पुन्हा या क्षेत्रात बांधकाम केले असल्याचं लक्षात आल्यानंतर याची दखल घेतली. व संबधित व्यक्तीला तब्बल 5 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. केवळ न्यायलायाने दंड ठोठावलेला नाही. तर आठवड्याभरात तो जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे आता दणाणले आहेत.

नियमावलीचे उल्लंघन केल्याने केली दंडात्मक कारवाई

वागातोर येथे गोवा पर्यटन विकास मंहामंडळाच्या जमिनीवरील बांधकाम हटवले होते. ही कारवाई काहीच दिवसांपुर्वी झाली आहे. असे असताना देखील जाणीवपुर्वक पुन्हा या नियमावलीचे उल्लंघन केल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अशा प्रकारे पुन्हा आपले ठिय्या या ठिकाणी मांडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या दंडात्मक कारवाईमुळे अशा कृत्यांना आता आळा बसणार आहे.

किनारी भागातील कायदा बांधकामावर पंचायत व पोलिसांची नजर आवश्यक

या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयानुसार किनारी भागात कोणतेही बेकायदा बांधकाम येणार नाही याची दक्षता संबंधित पंचायत व पोलिसांनी घ्यावी. असे बेकायदा बांधकाम आढळल्यास पंचायत, पोलीस जबाबदार असतील असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामूळे आता पंचायत व पोलिसांना अशा बांधकांवर लक्ष ठेवत कारवाई करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT