काँग्रेस पक्षाकडून अजून त्याबद्दल स्पष्टता दिली जात नाही. त्यामुळे युतीचे घोडे अर्ध्यावरच अडकून पडले आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa Election: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे घोडे आद्याप अर्ध्यावरच अडकले

युती ही काँग्रेसची गरज नाही. ती इतर पक्षांची गरज आहे, अशी भाषा करून सहकारी पक्षांना धुत्कारण्याची नवी नीती पुढे आणली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: भाजपला सत्तेबाहेर (BJP out of power) ठेवण्यासाठी गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने युती करून (Congress and Goa Forward Party in alliance) येणारी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी लोकांकडून होत असली तरी काँग्रेस पक्षाकडून अजून त्याबद्दल स्पष्टता दिली जात नाही. त्यामुळे युतीचे घोडे अर्ध्यावरच अडकून पडले आहे.

काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, रेजिनाल्ड लॉरेन्स आदींना अशी युती झालेली हवी आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना आणि त्यांच्या समर्थक सहकाऱ्यांची अशी युती नकोच, अशी भूमिका आहे. त्यातच नव्याने काँग्रेसमध्ये सामील झालेले माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यासारख्यांनी युती न करताही काँग्रेस सहज २१ जागा जिंकू शकते. युती ही काँग्रेसची गरज नाही. ती इतर पक्षांची गरज आहे, अशी भाषा करून सहकारी पक्षांना धुत्कारण्याची नवी नीती पुढे आणली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना या युतीबद्दल विचारले असता, युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी योग्यवेळी घेतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना विचारले असता, मला आता या विषयावर अधिक बोलायचे नाही, अशा त्रस्त स्वरात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यापूर्वी सरदेसाई यांनी काँग्रेसने युतीबद्दल लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा वेळ टळून जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT