Inflation Dainik Gomantak
गोवा

Rising inflation: महागाईचा आगडोंब! किंमतीत घट केवळ नावालाच

राज्यातील सामान्य जनता महागाईने हैराण!, जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात वाढच

गोमन्तक डिजिटल टीम

General public is shocked by inflation राज्यात तसेच देशभरात दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असून सर्वसामान्य जनता या वाढत्या महागाईने हैराण झाली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार देशात अन्नधान्य, इंधन आणि उत्पादीत वस्तूंच्या किंमतीत घट झाल्याचे म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षात याची कोणतीच चिन्हे दिसत नसून कडधान्य, दूध, व इतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये छोले ११५ रुपये प्रतिकिलो होते, तेच आता १३० ते १४० रुपये किलो झाले आहेत. मूगडाळ १०८ रुपये किलो होती, ती १२३ रुपयांवर पोहोचली आहे. तूरडाळ ११२ वरून १५९ रुपयांवर पोहोचली आहे. कडधान्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना ती परवडेनाशी झाली आहे.

हळसांदे 400 रु. किलो

गोमंतकीय नागरिकांचे आवडते हळसांदे चक्क 400रुपये प्रतिकिलो दराने पणजी बाजारात विकले जात असून काही मोजक्याच विक्रेत्यांकडे ते उपलब्ध आहेत.

हळसांद्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणीएवढा पुरवठा होत नसल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे विक्रेते सांगतात.

दुधाच्या किंमतीतही वाढ

लहान बालकांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आरोग्याच्या अनुषंगाने दूध हे जीवनावश्‍यक घटक आहे. परंतु या दुधाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. २५ रूपये अर्धा लिटर दराने मिळणारे दूध आत्ता २७ ते ३० रुपये अर्धा लिटर दराने विकले जात आहे.

भाज्यांच्या दरात देखील काहीवेळा अव्वाच्या सव्वा वाढ होते. मासळी, अंडी देखील महाग झाली आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तींनी तुटपुंज्या पगारात उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्‍न पडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT