Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिण गोव्याचा उमेदवारही दोन ते तीन दिवसांत जाहीर केला जाईल; सदानंद शेट तानावडे

Goa Politics: तानावडे: दोन ते तीन दिवसांत उमेदवार ठरणार

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

दक्षिण गोव्याची लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी महिलेला देणार असल्याचे जाहीर झाले व कित्येक महिलांनी आपली इच्छा व्यक्त केली असे भारतीय जनता पक्षाचे राज्य पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी शुक्रवारी मडगावात या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले, की तीन पुरुष उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठवलेली आहेत. मात्र, अजून महिलांची नावे पाठवलेली नाही.

कुंकळ्ळी येथील शेफाली वैद्य यांच्या नावाचा पक्ष विचार करीत आहे किंवा त्यांच्या नावाची चर्चा झाली यात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेफाली वैद्य यांचे नाव मध्येच कुणी घुसविले कळत नाही. मात्र, अन्य काही महिलांच्या नावांवर चर्चा झाली असे सांगून त्या महिलांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

संभाव्य महिला उमेदवारांची नावे येत्या एक दोन दिवसांत पक्षश्रेष्ठींना पाठवली जातील. दक्षिण गोव्याचा उमेदवारही दोन ते तीन दिवसांत जाहीर केला जाईल. पक्षश्रेष्ठींनी दक्षिण गोव्यातून महिला उमेदवारांची नावे पाठविण्यास सांगितलेले असले,

तरी महिलेलाच उमेदवारी मिळेल हे स्पष्ट केलेले नाही. पुरुष उमेदवाराचाही विचार होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. बाकीचे काहीही सांगो, मी किंवा मुख्यमंत्री जे सांगेन त्यातच खरेपणा असेल, असेही तानावडे यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT